sangrasha yatra | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

संघर्ष यात्रेत शेतकऱ्यांशी पवारांचा बैलगाडीतून संवाद

सरकारनामा ब्युरो
रविवार, 16 एप्रिल 2017

जळगाव : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कॉंग्रेस,राष्ट्रवादी कॉंग्रेससह विरोधी पक्षातर्फे काढण्यात आलेली संघर्ष यात्रेत पाळधी (जि.जळगाव ) येथे 
60 बैलगाड्यांचा सहभाग होता. बैलगाडीत बसून माजी मुख्यमंत्री अजित पवार, अर्थमंत्री जयंत पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार शशिकांत शिंदे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यांचे निवेदन स्वीकारले. 

विरोधी पक्षातर्फे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा कालपासून शिंदखेंडराजा (जि.बुलडाणा) येथे राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळाला अभिवादन करून सुरू झाला. विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील, माजी मुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार शशिकांत शिंदे, दिलीप वळसे पाटील, समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी, रिपाईचे जोगेंद्र कवाडे आदी यात सहभागी झाले आहे. रात्री ही यात्रा जळगाव येथे मुक्कामी होती. सकाळी 9 वाजता जळगावातून धुळ्याकडे ही यात्रा रवाना झाली. रस्त्यात पाळधी येथे यात्रेत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला, यावेळी तब्बल 80 बैलगाड्यांचा सहभाग होता. अजित पवार, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, आदीनी बैलगाडीत बसून जनतेला अभिवादन केले. यावेळी त्यानीं शेतकऱ्यांशी संवादही साधला. त्यांच्या व्यथाही जाणून घेतल्या, यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एरंडोल तालुकाध्यक्ष भटेश्‍वर पाटील, प्रा.एन.डी.पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रवींद्र भिलाजी पाटील, रमेश माणिक पाटील आदी कार्यकर्त्यानी स्वागत केले. यावेळी मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते. पुढे ही यात्रा एरंडोलकडे रवाना झाली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख