संग्राम मोहोळ यांचा सहा हजार मतांनी पराभव

...
संग्राम मोहोळ यांचा सहा हजार मतांनी पराभव

पौड : संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत मतदारांनी माजी खासदार, कारखान्याचे अध्यक्ष विदूरा नवले यांच्याकडेच पुन्हा सत्तेची चावी दिली आहे. सर्वांचे लक्ष लागलेल्या पौड - पिरंगुट गटात माजी खासदार अशोक मोहोळ यांचे पुत्र संग्राम मोहोळ यांना मात्र सहा हजार मतांच्या फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले. मुळशी, मावळ, खेड, शिरूर, हवेली तालुक्यातील ऊस उत्पादकांनी नवले पॅनेलवर विश्वास दर्शविला असून 9974 मते देत विदुरा नवले यांनाचा सर्वाधिक मते दिली आहेत.

गेली पंचवार्षिक वगळता वीस वर्षात या कारखान्यात संचालकांच्या बिनविरोध निवडणूका झाल्या. तेव्हापासून आतापर्यंत सर्वांनी कारखान्याची अध्यक्षपदाची धुरा  नवले यांच्या हाती सोपविली होती. यावेळीही कारखाना बिनविरोध व्हावा यासाठी सर्वांनी प्रयत्न केले. सर्वानुमते संचालक निवडीचे अधिकारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपविण्यात आले होते. पवार यांनी सर्वपक्षाला स्थान देत संचालकांची नावे जाहीर केली. परंतु नाराज झालेल्या काही उमेदवारांनी बंडाचे निशाण फुंकले.

त्यात एकेकाळी खांद्याला खांदा लावून मुळशीच्या विकासासाठी सदोदीत प्रयत्नशील असलेले नवले आणि अशोक मोहोळ हे दोन माजी खासदार यावेळी मात्र एकमेकाच्या विरोधात दंड थोपटून होते. त्यामुळे निवडणूकीची रंगत वाढली होती. मोहोळ पितापुत्र आणि कारखाना कार्यक्षेत्रातील कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी छुप्या आणि उघड पद्धतीने संग्राम मोहोळ यांच्यासाठी धावपळ केली. मतदारांना भावनिक साद घातली. सोशल मिडीयावर संग्राम यांचा उमेदवारी अर्ज भरताना उपस्थित असलेले विदूरा नवले, रमेशचंद्र ढमाले यांचा फोटोही व्हायरल केला. मुळशी, मावळमध्ये शिवसेनेला पॅनेलमध्ये स्थान न दिल्याने नवले पॅनेलला मतदान न करण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष रमेश कोंडे, तालुका अध्यक्ष संतोष मोहोळ यांनी केले होते.

मुळशी तालुक्यातील हिंजवडी - ताथवडे गटात पांडूरंग राक्षे यांनी पॅनलला पाठींबा दिल्याने येथे औपचारिकता राहीली होती. या गटातील विदूरा नवले यांना  9974  मते मिळाली. तर बाळासाहेब बावकर 9421 आणि तुकाराम विनोदे 9090 मते मिळवून विजयी झाले. या गटात 715 मते बाद झाली आहेत. पौड - पिरंगुट गटाकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. या गटांतील दिलीप दगडे यांना  9401  मते मिळाली. तर अंकुश उभे 9438 आणि महादेव दुडे 8679 मते मिळवून विजयी झाले. संग्राम मोहोळ यांना मात्र 2337  मतांवर समाधान मानावे लागले. येथे 587 मते बाद झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com