कदम व देशमुख गटांतील राजकीय संघर्ष भडकणार ? 

तर देशमुख यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर आता कॉंग्रेसच्या गोटात त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. तर त्याचा कदम गटांकडून कसा "डिफेन्स' केला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
sangram-deshmukh-vishwajeet Kadam political battle
sangram-deshmukh-vishwajeet Kadam political battle

कडेगाव  : देवराष्ट्रे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या श्रेयवादावरून कदम व देशमुख या पारंपरिक विरोधकातील राजकीय संघर्ष भडकण्याची चिन्हे दिसत  आहेत .

 जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी यानिमित्ताने विरोधकांना दिलेल्या इशाऱ्यामुळे यामध्ये आणखी भरच पडली आहे. तर देशमुख यांनी केलेल्या हल्ल्यानंतर आता कदम हे कसा प्रतिहल्ला करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


तत्कालीन पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रयत्नातून देवराष्ट्रे येथे जून 2014 मध्ये खास बाब म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केले होते. यानंतर जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी या आरोग्य केंद्रासाठी आवश्‍यक असणारी जागा जिल्हा परिषदेच्या नावे करून इमारत बांधकामासाठी आवश्‍यक असणारी प्रशासकीय मान्यता घेतली. 


याकामी देवराष्ट्रे ग्रामपंचायतनेही सहकार्य केले. आता या जागेत प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत साकारणार असून या इमारतीचा भूमिपूजन समारंभात राजशिष्टाचार पाळून भाजपने कॉंग्रेसचे आमदार मोहनराव कदम, डॉ. विश्वजित कदम यांना निमंत्रित करावे याबाबत येथील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी तक्रार केली होती. त्यानंतर या आरोग्य केंद्राच्या भूमिपूजनावरून देशमुख व कदम गटांत श्रेयवादाचे राजकारण सुरू झाले.


त्यानंतर जि.प.अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या हस्ते या आरोग्य केंद्राचे भूमिपूजन काल गुरुवारी (ता.19) पार पडले. यावेळी संग्रामसिंह यांनी टेंभू योजने सारख्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या कोट्यवधी रुपये खर्चाच्या सिंचन योजनेचे भूमिपूजन या योजनेला मंजुरी मिळण्याच्या अगोदर कडेगाव येथे आम्ही केले होते. याची आठवण करून दिली.


 तसेच असे असतानाही ही योजना पूर्ण होऊन आज सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील दुष्काळी भागाचे नंदनवन झाले आहे. तर यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या जन्मभूमीत होणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राला सहकार्याची भूमिका घेण्याऐवजी त्यामध्ये कॉंग्रेसकडून श्रेयवादाचाचे राजकारण केले जात आहे. विकास कामात राजकारण केले जात आहे. तेव्हा विकास कामांच्या आडवे याल तर खबरदार असा इशारा देशमुख यांनी यावेळी दिला.


तर देशमुख यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर आता कॉंग्रेसच्या गोटात त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. तर त्याचा कदम गटांकडून कसा "डिफेन्स' केला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com