संग्राम जगताप मुलाखतीला गैरहजर; पण अरुणकाकांनी राष्ट्रवादीतच असल्याची दिली ग्वाही

संग्राम जगताप मुलाखतीला गैरहजर; पण अरुणकाकांनी राष्ट्रवादीतच असल्याची दिली ग्वाही

पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या सुरू केलेल्या मुलाखतींसाठी नगरचे आमदार संग्राम जगताप हे गैरहजर असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र त्यांचे वडिल आणि विधान परिषदेचे आमदार अरुणकाका जगताप यांनी पक्षाच्या निरीक्षकांची भेट घेऊन संग्राम यांनाच उमेदवारी देण्याची मागणी केली.  नगरमधील राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सर्व नगरसेवकही या वेळी उपस्थित होते.

पक्षाचे निरीक्षक आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, अंकुश काकडे यांनी नगर जिल्ह्यातील इच्छुकांच्या आज मुलाखती घेतल्या. नगर शहर मतदारसंघातून संग्राम यांच्याऐवजी त्यांची वडील अरूणकाक जगताप यांनी निरीक्षकांची भेट घेतली. तसेच त्यांच्या समर्थक नगरसेवकांनीही संग्राम यांनाच उमेदवारी द्या, अशी एकमुखी मागणी केली. 

संग्राम जगताप हे शिवसेनेच्या वाटेवर असून त्यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने ते राष्ट्रवादीला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. त्यानंतर शिवसेनेने त्यांना प्रवेश देणार नसल्याचे स्पष्ट केले. तरीही जगताप हे राष्ट्रवादीत राहणार की नाही, याची चर्चा होत होती.

पक्षाचे दुसरे आमदार वैभव पिचड हे मात्र या मुलाखतींकडे फिरकले नाहीत. त्यांनी कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. रोहित पवार यांनी कर्जत-जामखेडसाठी आज मुलाखत दिली. श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप यांच्यावर भाजपने जाळे फेकले असल्याची चर्चा आहे. त्यांनीही राष्ट्रवादीकडेच आज मुलाखत दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com