सांगलीचे तीन जावई झाले पुन्हा आमदार!  

सासरे-जावयाचा पराभव तासगाव-कवठेमहांकाळमध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाणावर लढणारे अजितराव घोरपडे मोठ्या मतांनी पराभूत झाले. श्री. घोरपडे यांचे जावई सत्यजितसिंह पाटणकर पाटण (जि. सातारा) मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून लढताना पराभूत झाले. एकाचवेळी सासरे-जावयांचा पराभव झाला. या मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून सुमन पाटील दुसऱ्यांदा विधानसभेत गेल्या. मात्र दौंड (जि. पुणे) मतदारसंघातून त्यांचे चुलत व्याही रमेश थोरात राष्ट्रवादीकडून पराभूत झाले आहेत.
सांगलीचे तीन जावई झाले पुन्हा आमदार!  

सांगली : विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीला जिल्ह्यात लक्षणीय यश मिळाले. निकटचे नातेवाईक असलेले तिघे आमदार झालेत. राज्यातील इतर मतदारसंघातील त्यांचे नातेवाईक काही ठिकाणी विजयी, तर काही ठिकाणी पराभूत झाल्याने "कहीं खुशी कहीं गम' अशी अवस्था आहे. व्याही, भाऊजी, मावसबंधू, मामा-भाचे आता सभागृहात दिसतील. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे जिल्ह्याचे तिघे जावई पुन्हा आमदार झालेत. 

राजकारणात नातलगशाही पूर्वापार सुरू आहे. सोयीसाठी कोण कोणत्या पक्षात हा भाग अलाहिदा. सत्ता, खुर्चीसाठी तडजोडी करून पदासाठी लाभार्थी होण्यात काहीच वाटत नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे या दोघांचीही सासुरवाडी बेडग (ता. मिरज) आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात तांबवे (ता. वाळवा) चे जावई आहेत. अटीतटीच्या लढतीत त्यांनी गुलाल उधळला. तिघेही मातब्बर आहेत. राजकारणात त्यांना अर्धांगिणीची साथ मिळत आहे.  माजी मंत्री पतंगराव कदम यांचे चिरंजीव डॉ. विश्‍वजित कदम, पलूस-कडेगाव मतदारसंघातून तर जावई संजय जगताप पुरंदर (जि. पुणे) हे दोघे कॉंग्रेसकडून विजयी झाले. दोघांनीही शिवसेनेच्या उमेदवारांना धूळ चारली. शिवसेनेचे विद्यमान राज्यमंत्री विजय शिवतारे यांची हॅट्‌ट्रीक हुकवत संजय जगताप तिसऱ्यावेळी यशस्वी झाले. विश्‍वजित कदमांचे मावसबंधू विक्रम सावंत जत मतदारसंघातून भाजपवर मात करून मोठ्या फरकाने विजयी झाले. त्यांचे निकटचे नातेवाईक मानसिंगराव नाईक भाजपचा वारू रोखत आमदार झाले.  शिराळ्यातील अपक्ष उमेदवार सम्राट महाडिक यांनी चांगली लढत दिली. विजयापर्यंत त्यांना जाता आले नाही. त्याचप्रमाणे त्यांचे चुलत बंधू भाजपचे अमल महाडिक यांना कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून दुसऱ्यांदा लढताना कॉंग्रेसकडून पराभवाला सामोरे जावे लागले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इस्लामपूर मतदारसंघातून सातव्यांदा विजयाची गुढी उभारली. त्यांचे भाचे प्राजक्‍त तनपुरे हे राहुरी (जि. नगर) मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून विजयी होत "जायंट किलर' ठरलेत.     

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com