अधीक्षक सुहेल शर्मांचा दणका : गुंड सचिन सावंत टोळीला मोक्‍का  - Sangli SP Shel sharma imposes MOCCA on Sachin Sawant gang | Politics Marathi News - Sarkarnama

अधीक्षक सुहेल शर्मांचा दणका : गुंड सचिन सावंत टोळीला मोक्‍का 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 डिसेंबर 2017

सांगली  : पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी जिल्ह्यातील गुंडांच्या टोळ्यांना जरब बसवण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली असून त्यांनी पहिला दणका सावंत टोळीला दिला आहे.

 खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, दरोडा, सावकारी आदी विविध गुन्हे करुन शहरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सावंत टोळीचा म्होरक्‍या सचिन सावंतसह दहाजणांना आज संघटित गुन्हेगारी विरोधी मोक्‍का कायदा लावला. 

सावंत टोळीचा म्होरक्‍या सचिन रमाकांत सावंत व त्याच्या साथीदारांनी घातक शस्त्रे लोखंडी रॉड, जांबीया, काठ्या घेऊन शकील मकानदार याचा तीन महिन्यांपुर्वी मराठा सेवा संघाच्या कार्यालयासमोर खून केला होता. शकील मकानदार हा पुर्वी सचिन सावंतसाठी काम करीत होता. 

मात्र सचिन सावंत बरोबर आर्थिक वाद झाल्यामुळे तो त्याच्यापासून दुरावला होता. परंतु शकील मकानदार हा यातील फिर्यादी महेंद्र ऊर्फ बाळासाहेब भोकरेशी बोलतो, भेटतो या कारणावरून चिडून जावून त्याचा खून केला. तसेच फिर्यादी साक्षीदार अभिजीत भोकरे, अक्षय शिंदे यांना शिवीगाळ देऊन लोखंडी रॉडने व काठ्यांनी मारहाण करून त्यांना जखमी केले होते. 

सदर टोळीतील सदस्य सचिन सावंत व त्याचे एकूण 9 साथीदारांविरूद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अधिनियम सन 1999 नुसार विश्रामबाग पोलिस निरीक्षकांनी प्रस्ताव सादर केला होता. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी प्रस्तावाला मंजूरी देऊन सावंत टोळीला मोका लावण्यास हिरवा कंदील दाखवला. 

सचिन सावंत यांचेविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी, सावकारी करणे, जबरी चोरी करणे वगैरे सारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल असुन त्याचे साथीदाराविरूद्ध ही अशाप्रकारचे गुन्हे दाखल असल्याने ही कारवाई झाली आहे . 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख