Sangli Results Jolt to NCP State President | Sarkarnama

#SangliResults राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांना दणका : सांगलीच्या पराभवाने आघाडी हवालदिल 

संजय मिस्कीन
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

मागील पंधरा वर्षे सांगली महानरपालिकेत काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती. जयंत पाटील व प्रतिक पाटील यांच्यासह इतर मातब्बर नेते आघाडीकडे होते. राज्याच्या राजकारणात स्वत:चा वेगळा ठसा या नेत्यांनी उमटवला आहे. त्यातच जयंत पाटील यांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद दिल्यानतंर सांगली महापालिकेत फायदा होईल अशी अटकळ बांधली जात होती.

मुंबई : राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना स्वत:च्या गडातच पराभवाचा दणका बसल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी हवालदिल झाल्याचे चित्र आहे. महानगरपालिकेच्या मैदानात भारतीय जनता पक्षाने एकहाती लढूनही काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला सर केला. या पराभवाने आगामी 2019 च्या विधानसभा निवडणूकीची रंगीत तालीम सुरू झाल्याची चर्चा असून भाजपच्या रणनितीसमोर सर्वच पक्षाचे पानिपत होत असल्याचे मानले जाते.

मागील पंधरा वर्षे सांगली महानरपालिकेत काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती. जयंत पाटील व प्रतिक पाटील यांच्यासह इतर मातब्बर नेते आघाडीकडे होते. राज्याच्या राजकारणात स्वत:चा वेगळा ठसा या नेत्यांनी उमटवला आहे. त्यातच जयंत पाटील यांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद दिल्यानतंर सांगली महापालिकेत फायदा होईल अशी अटकळ बांधली जात होती. आजपर्यंतच्या निवडणूकांत काँग्रेस व राष्ट्रवादी स्वबळावरच परस्परांच्या विरोधात उभी राहत होती. मात्र, यावेळी पहिल्यांदाच आघाडी करून निवडणूक लढवतानाही दोन्ही पक्षाला पराभवाचा दणका बसला. 

मराठा आदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रचाराला देखील येण्यापासून रोखण्यात आले होते. अशा स्थितीती भारतीय जनता पक्षाने काँग्रेस राष्ट्रवादीकडून सत्ता खेचून घेण्यात यश मिळवले आहे. या पराभवाने काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीच्या नेत्यामधे मात्र चिंतेचा सूर आहे.

सरकारनामा अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख