सांगली कारागृहातून महापुरात दोन कैदी पळाले पण पकडलेही !

.
sangli-jail
sangli-jail

सांगली :  पुराच्या पाण्याचा फायदा घेत कारागृहातील दोन कैद्य पळाले. प्रशासनाच्या सर्तकतेमुळे त्यांना तातडीने पकडण्यात आले.

गेल्या चार दिवसांपासून पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पाणी पातळीने पन्नाशी गाठल्याने मुख्य शहरातील टिळक चौक, हरभट रोड, राजवाडा परिसरात पाणी आले. दोन दिवसापूर्वी जून्या जिल्हाधिकारी कार्यालयात पाण्याने वेढा दिला. तेथील कारागृहातही पाणी शिरले. अधीक्षकांच्या कक्षापर्यंत चार फुट पाणी आले होते. त्यानंतर पाणी पातळी वाढली. कारागृह परिसरात दहा फुट पाणी झाल्याने बाहेर संपर्क तुटला. तेथील 340 कैद्यांना दुसऱ्या मजल्यावरील बरागमध्ये रवाना करण्याचे काम सुरू होते. त्यावेळी दोघा कैद्यांनी पाण्यात उडी घेतली. पोहत स्वयंपाक गृहापर्यंत गेले. तेथून त्यांनी भिंतीवरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

 हा सारा प्रकार तेथील कर्मचाऱ्यांच्या लक्ष्यात आला. कारागृह पोलिसांनी प्रसंगावधान राखून  तातडीने पाण्यात उड्या घेतल्या आणि  दोघांनाही पकडून आणले. दरम्यान, कारागृहातील पाण्याची  वाढती पातळी पाहता. तेथील कैद्यांना यापूर्वीच स्थलांतरीत करायला हवे होते. मात्र, जिल्हा प्रशासनाने त्याकडे गांभिर्याने घेतले नाही. त्यामुळे आज पाणी वाढले. चारही बाजून पाण्याने वेढा दिल्याने तेथील सुविधेचाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. कारागृह प्रशासनाच्या सर्तकतेने पुढील घटना टळली. मात्र, पुढील टप्प्यात आणखी धोका निर्माण झाला असून सुरक्षिततेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com