sangli corporation result bjp wins | Sarkarnama

भाजपने सांगलीत इतिहास रचला! भोपळा फोडला, निर्विवाद सत्ताही खेचली! 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

#SangliResult
भाजपचा येथे एकही कमळ चिन्हावरचा नगरसेवक नसतानाही आणि दोन्ही कॉंग्रेस एक होऊनही आम्ही महापालिकेवर भाजपचा झेडा फडकवला आहे. येथील नागरिकांनी जातीयवादालाही थारा दिला नाही. भ्रष्टाचारी कारभार आणि विकास पत्ता नाही, या दोन्ही कारणांनी सत्ताधाऱ्यांना नाकारले आहे. येथील नागरिकांचे विकासाचे स्वप्न भाजप साकार करेल. या शहराला प्रगतीपथावर आणण्यासाठी आणि तरुणाईला रोजगार देण्यासाठी आम्ही नक्‍कीच चांगले नियोजन करू. 
 -सुभाष देशमुख, पालकमंत्री

सांगली: महापालिकेत शुन्यावरून थेट 41 जागांवर मुसंडी मारत भाजपने अखेर सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेवर कमळ फुलवले. जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीपासून सुरु झालेली भाजपची घौडदौड कायम असून महापालिका जिंकून भाजपने गोल पूर्ण केला आहे. 

या विजयाने जिल्हा बॅंक वगळता बहुतांश सत्तास्थानावर भाजपने कब्जा मिळवला आहे. यानिमित्ताने स्वातंत्र्यानंतर प्रथमच आधीच्या नगरपालिका आणि आणि गेल्या वीस वर्षात प्रथमच कॉंग्रेसेतर पक्षाचे म्हणजे भाजपने निर्विवाद सत्ता मिळवली आहे. 

2014 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी नावाचे वादळ देशस्तरावर तयार होण्याआधी महापालिकेची 2013 मध्ये निवडणूक झाली होती. यावेळी कॉंग्रेसने गत सत्ताधारी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील पुरस्कृत महाआघाडीचा पराभव केला होता. अखेरच्या टप्प्यात महाआघाडीच्या सत्तेचे पुरते बारा वाजले होते. या महाआघाडीत तत्कालीन भाजप आमदार संभाजी पवार यांच्या नेतृत्वाखालील स्वाभीमानी आघाडीत भाजपचा सहभाग होता. पुढे पवारांनी भाजपपासून फारकत घेतल्यानंतर महापालिकेत भाजपचे म्हणवले जाणारे तीनच नगरसेवक उरले होते. मात्र ते चिन्हावर सभागृहात आले नसल्याने गत सभागृहात भाजपचे शून्यच स्थान होते. त्यामुळे भाजपचा आजचा विजय शुन्यावरून थेट 41 जागावर म्हटला पाहिजे. 

लोकसभा निवडणूक झाली आणि जिल्ह्यात लोकसभा, पुढे विधानसभेला चार आमदार ,त्यानंतर पाच पंचायत समित्या, जिल्हा परिषद असे सत्तेचे सोपान भाजप चढतच राहिला. आता महापालिकेतील विजयाने जणू सत्तेचे वर्तुळ पुर्ण झाले. आजघडीला दोन आमदार, मिरज पंचायत समिती आणि आणि आता तीन शहरांची महापालिका अशी निर्विवाद भाजपची सत्ता महापालिका क्षेत्रात आली आहे. ही सर्व सत्तांतरे स्वातंत्र्यानंतर प्रथमच झाली म्हटली तर चुकीचे ठरणार नाही. 

सांगली महापालिका निवडणून निकाल : 
भाजप 41, कॉंग्रेस 20, राष्ट्रवादी 15 जागांवर विजयी, स्वाभीमानी आघाडी 1, अपक्ष 1 

जाहीर निकाल विजयी उमेदवार : 
प्रभाग 1 : शेडजी मोहिते (राष्ट्रवादी), राईसा रंगरेज (कॉंग्रेस), पद्मश्री पाटील (कॉंग्रेस), विजय घाडगे (स्वाभिमानी) 
प्रभाग 2 : सविता मोहिते (राष्ट्रवादी), वहिदा नायकवडी (कॉंग्रेस), प्रकाश ढंग (भाजप), गजानन मगदूम (अपक्ष), 
प्रभाग 3 : अनिता व्हनखंडे, शिवाजी दुर्वे, शांता जाधव, संदीप आवटी (सर्व भाजप) 
प्रभाग 4 : पांडुरंग कोरे, अस्मिता सरगर, मोहना ठाणेदार, निरंजन आवटी (सर्व भाजप) 
प्रभाग 5 : संजय मेंढे, बबिता मेंढे, करण जामदार (सर्व कॉंग्रेस), मालन हुलवान (राष्ट्रवादी) 
प्रभाग 6 : मैनुद्दीन बागवान, नर्गिस सय्यद, रजिया काझी, अतहर नायकवडी (सर्व राष्ट्रवादी) 
प्रभाग 7 : आनंदा देवमाने, संगीता खोत, गायत्री कल्लोळी, गणेश माळी (सर्व भाजप) 
प्रभाग 8 : सोनाली सागरे, कल्पना कोळेकर, राजेंद्र कुंभार (भाजप), विष्णू माने (राष्ट्रवादी) 
प्रभाग 9 : मनगु सरगर (राष्ट्रवादी), रोहिणी पाटील, मदीना बारूदवाले, संतोष पाटील (कॉंग्रेस) 
प्रभाग 10 : जगन्नाथ ठोकळे, अनारकली कुरणे (भाजप), प्रकाश मुळके, वर्षा निंबाळकर (कॉंग्रेस) 
प्रभाग 11 : कांचन कांबळे, मनोज सरगर, शुभांगी साळुंखे, उमेश पाटील (सर्व कॉंग्रेस) 
प्रभाग 12 : संजय सरगर, नसीम शेख, लक्ष्मी सरगर, धीरज सूर्यवंशी (सर्व भाजप) 
प्रभाग 13 : गजानन आलदर, अपर्णा कदम, अजिंक्‍य पाटील (सर्व भाजप) 
प्रभाग 14 : सुब्राव मद्रासी, उर्मिला बेलवलकर, भारती दिगडे, युवराज बावडेकर (भाजप) 
प्रभाग 15 : फिरोज पठाण, आरती वळवडे, पवित्र केरीपाळे, मंगेश चव्हाण (सर्व कॉंग्रेस) 
प्रभाग 16 : हारुण शिकलगार, उत्तम साखळकर (कॉंग्रेस), स्वाती शिंदे, सुनंदा राऊत (भाजप) 
प्रभाग 17 : गीता सुतार, गीता सूर्यवंशी, लक्ष्मण नवलाई (सर्व भाजप) दिग्विजय सूर्यवंशी (राष्ट्रवादी) 
प्रभाग 18 : अभिजीत भोसले (कॉंग्रेस), महेंद्र सावंत, स्नेहल सावंत, नसीम नाईक (भाजप) 
प्रभाग 19 : अप्सरा वायदंडे, सविता मदने, संजय कुलकर्णी, विनायक सिंहासने (भाजप) 
प्रभाग 20 : योगेंद्र थोरात, संगीता थोरात, प्रियांका पारधी (सर्व राष्ट्रवादी) 
 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख