पाच टक्के साखर उद्याच खरेदी करा; मुख्यमंत्र्यांना आव्हान!

पाच टक्के साखर उद्याच खरेदी करा; मुख्यमंत्र्यांना आव्हान!

सांगली : "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोकळ घोषणा करून वेळ मारून नेण्यापेक्षा उत्पादित साखरेच्या पाच टक्के साखर खरेदी उद्याच करावी. सरकार साखर खरेदीत उतरलेय म्हटल्यावर तत्काळ बाजार वधारेल; मात्र या सरकारला केवळ घोषणा करायच्या आहेत. हे लबाडाघरचं आवतन आहे,' असा हल्लाबोल खासदार राजू शेट्टी आणि शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांना केला. 

"सकाळ'तर्फे आयोजित "साखर संकट : वास्तव काय?' या विषयावरील "सकाळ महाचर्चे'त ते बोलत होते. इस्लामपूर येथील दौऱ्यात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी, "सरकार 3200 रुपये दराने उत्पादित साखरेच्या 25 टक्के साखर खरेदी करेल,' या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचा पुनरुच्चार केला. त्याबद्दल महाचर्चेत विचारले असता शेट्टी आणि रघुनाथदादांनी हल्लाबोल केला. 

ते म्हणाले, ""या सरकारला घोषणा करायला जातेय काय? द्यायचेच नाही, मोठे बोलून वेळ मारून नेण्याचा हा धंदा आहे. त्यांना खरेच साखर खरेदी करायची असेल, तर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ पाच टक्के साखर खरेदी करावी. त्याचे पैसे साखर कारखान्यांना द्यावेत. सरकार साखर खरेदीत उतरले, हे लक्षात आल्यास बाजार तत्काळ वाढेल, यात शंका नाही. सध्या साखर दर कमी होत असल्याबद्दल जी ओरड होतेय, तीही थांबेल.'' 
साखर उद्योगाबाबतच्या धोरणावर सर्वांनी एकत्रितपणे केंद्राची भेट घेतली पाहिजे. त्यासाठी एकजूट गरजेची आहे, असे आवाहन शेट्टी यांनी केले. सहयोगी संपादक शेखर जोशी यांनी स्वागत केले. मान्यवरांचा सत्कार जोशी, वरिष्ठ व्यवस्थापक (जाहिरात) उदय देशपांडे, जयसिंग कुंभार यांच्या हस्ते झाला. सूत्रसंचालन "ऍग्रोवन'चे व्यवस्थापक शीतल मासाळ यांनी केले. अजित झळके यांनी आभार मानले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com