संगीता ठोंबरेंनीही लावली उमेदवारीसाठी ताकद

भाजप आमदार संगीता ठोंबरे यांच्या उमेदवारीला पक्षाबरोबरच शिवसेनेही विरोध केला आहे.
Pankaja_Munde_sangita_Thomb
Pankaja_Munde_sangita_Thomb

बीड : भाजप आमदार संगीता ठोंबरे यांच्या उमेदवारीला पक्षातून  विरोध आणि शिवसेनेही उमेदवार बदलाचा सूर आळविल्यानंतर आता ठोंबरे गट देखील सक्रिय झाला आहे. आमदार ठोंबरे यांच्यासह समर्थकांनी दोन  दिवसांपूर्वी भाजप नेत्या आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेतली.

आता विरोधी गट बाजी मारणार की उमेदवारी मिळवून संगीता ठोंबरे पक्षांतर्गत विरोधकांचे दात घशात घालणार हे लवकरच कळणार आहे. 

निवडणूक जसजशी जवळ आली तसे केज विधानसभा मतदार संघाच्या भाजप आमदार संगीता ठोंबरे यांच्या उमेदवारीला भाजपातूनच विरोध सुरू झाला. शिवसेनेनेही संपर्क प्रमुखांच्या मेळव्यात भाजपने उमेदवार बदलला तरच सहकार्य अशी थेट भूमिका घेतली. 

पक्षनिरीक्षक मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे पाच जणांनी उमेदवारी मागितली. दरम्यान, संगीता ठोंबरेंना भाजप उमेदवारी नको म्हणणाऱ्यांनी फक्त त्या नको इतर कोणालाही द्या, अशी भूमिका घेतली. एकूणच भाजपातील ठोंबरे विरोधक आणि शिवसेना यांचा एक सूर आल्याने पेच निर्माण झाला आहे. 

पण, आतापर्यंत शांत असलेला ठोंबरे गट सक्रिय झाला आहे. आचारसंहिता लागून उमेदवाऱ्या जाहीर होण्याच्या  तोंडावर या गटाने पंकजा मुंडे यांची भेट घेतली. खुद्द आमदार संगीता ठोंबरे यांच्यासह भेटलेल्या या शिष्टमंडळाने  संगीता ठोंबरे यांच्या उमेदवारीसाठी मुंडे यांच्याकडे आग्रह धरला. 

सभापती संतोष हंगे, सुनील लोमटे, दत्ता धस, हारून इनामदार, सुधाकर लांब, पंजाब देशमुख, प्रवीण देशपांडे आदींची सोबत दाखवत एक प्रकारे आपल्या गटाची ताकदही दाखवून दिली आहे. आमदार संगीता ठोंबरेंना उमेदवारी नको म्हणणारे बाजी मारतात का पुन्हा उमेदवारीची माळ गळ्यात पडून घेऊन ठोंबरे या गटाला जागा दाखवितात हे लवकरच कळेल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com