sangita thombare and beed | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

आमदार संगीता ठोंबरेंची सूतगिरणी सुरू होण्यापूर्वीच वादात

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

आमदार संगीता ठोंबरे यांच्या पुढाकाराने केज तालुक्‍यात उभारल्या जाणाऱ्या लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे मागसवर्गीय सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष त्यांचे पती डॉ. विजयप्रकाश ठोंबरे आहेत. 

बीड : भाजप आमदार संगीता ठोंबरे यांच्या पुढाकाराने उभारल्या जाणाऱ्या लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे मागासवर्गीय सहकारी सुतगिरणीतील अनियमिततेचा मुद्दा आता अधिवेशनातही पोचला आहे. यापूर्वीही याबाबत आरोप आणि तक्रारी झाल्या होत्या. केज विधानसभेतील भाजप आमदार संगीता ठोंबरे ठोंबरे नोकरी सोडून राजकारणात आल्या आणि आमदार झाल्या. मात्र, राजकारणात स्थिरावायचे असेल तर संस्था असाव्यात या विचारातून त्यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सहकारी सुतगिरणीचा प्रस्ताव सरकारदरबारी दाखल केला. 

नोकरीत असलेले त्यांचे पती डॉ. वियप्रकाश ठोंबरे यांनीही राजकारणात साथ देण्यासाठी आणि या सुतगीरणीचा कारभार पाहण्यासाठी नोकरीचा राजीनामा दिला. डॉ. विजयप्रकाश ठोंबरे अध्यक्ष असलेल्या या आणि सध्या प्रगतीथवर आहे. 60 कोटींहून अधिक रकमेच्या या सूतगिरणीला आतापर्यंत 27 कोटी 41 लाख रुपयांचे शासकीय भाग भांडवल मंजुर झाले आहे. मात्र, कार्यान्वित नसलेल्या या सूतगिरणीबाबत शासन नियम व निकषांची पुर्तता केली नाही, सुतगिरणीच्या 29 टक्के सभासदांनी अद्याप जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही, संस्थेच्या पोटनियमातील तरतुदीनुसार 2 तज्ञ संचालकांची नियुक्ती झालेली नाही. 

सूतगिरणीला कापुस पुरवठा करण्याबाबतचे हमीपत्र सुध्दा अद्याप उपलब्ध झालेले नाही, सभासदांची के. वाय.सी. अपूर्ण आहे अशा अनेक तक्रारी यापूर्वीही झालेल्या होत्या. तसेच लेखा परीक्षकांच्या अहवालतही हे मुद्दे आलेले आहेत. दरम्यान, आता विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही याबाबत विधान परिषदेत नियम 93 अन्वये मुद्दा उपस्थित केला. यावरुन आता सभापतींच्या दालनात बैठकीचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, आगामी विधानसभेच्या अगोदर ही सुतगिरणी सुरु करण्यासाठी ठोंबरे दाम्पत्याचे प्रयत्न आहेत. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख