सावळजची कन्या नवी मुंबईच्या सभापतीपदी

सावळज कन्या संगीता यांचा विवाह सन 1991 मध्ये अशोकराव पाटील (नवी मुंबई) यांच्याशी झाला.पती अशोकराव पाटील हे नवी मुबई राजकारणात सक्रिय आहेत.
sangita Patil.
sangita Patil.

सांगली  : सावळजचे कै.आप्पासाहेब भीमराव निकम व माजी सभापती अशोकराव पाटील यांची पत्नी नगरसेविका सौ. संगीता अशोक पाटील यांची नवी मुंबईमहानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे.

या निवडीनंतरआमदार गणेश नाईक व महापौर जयंवत सुतार पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. सावळज माहेरवाशीनीच्या निवडीने ग्रामस्थांमधून अभिनंदन व कौतुक होत आहे.

सावळज कन्या संगीता यांचा विवाह सन 1991 मध्ये अशोकराव पाटील (नवी मुंबई) यांच्याशी झाला. पती अशोकराव पाटील हे नवी मुबई राजकारणात सक्रिय आहेत. राजकारणातील सक्रियतेमुळे अशोक पाटील यांनी यापूर्वी मुबंई महानगरपालिकेचे नगरसेवक व सभापती पद भूषविले आहे.

त्यामुळे संगीता पाटील यांनीही पतीचा राजकीय वारसा चालू ठेवला.सामाजिक कार्यातून समाजकारण व राजकारणात सक्रिय राहिल्या.त्यातून 2015 मधील महानगरपालिकेच्या निवडणुकीत सेकटर 15 मधून सौ.पाटील निवडून येऊन नगरसेवकपदी विराजमान झाल्या.

त्यांनी सामाजिक कामे,विविध विकास कामाच्या बळावर पालिका राजकारणात स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले. महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या सभापती निवडीत संगीता पाटील यांनी कार्यकर्तृत्वाचा जोरावर महिला व बालकल्याण सभापतीपद पटकावले आहे.  त्यांच्या  निवडीने सावळजच्या शिरपेचात  आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. सौ.पाटील यांच्यावर सर्वांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com