sangharshayatra | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

साताऱ्यात गुरूवारी मध्यरात्रीपासून सात दिवस कडक लॉकडाउन करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित सर्वकाही बंद राहणार आहे.

कर्जमाफीचे की मटक्‍याचे आकडे काढताय ? : अजित पवार 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 27 एप्रिल 2017

आर.आर.पाटील हे उपमुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री विलासराव देशमुख परदेशात गेल्याने त्यांना कॅबिनेटची बैठक घेण्याचा मान एकदाच मिळाला. मला मात्र एकदाही
तो मान मिळाला नाही, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे बघून अजित पवार म्हणाले, त्यावर एकच हशा पिकला. 
 

सातारा : कर्जमाफीचा विचार आम्ही करत असून आमचे आकडे काढायचे काम सुरु असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील सांगत आहेत. आता मटक्‍याचे आकडे काढताय का ? असा सणसणीत टोला लगावत सामंजस्याने कर्जमाफीची मागणी करतोय, आत्ता पाझर फुटेल, मग फुटेल, पण ते पानवतच नाहीत. "आई जेवू घालेना, बाप भीक मागू देईना ' अशी अवस्था भाजप सरकारच्या कारकिर्दीत राज्यातील शेतकऱ्यांची झाली आहे, अशी टीका अजित पवार यांनी कऱ्हाडात केली. 

अजित पवार म्हणाले," शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांना वाचा फोडण्याचे काम संघर्ष यात्रेच्यानिमित्ताने करत आहोत. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जबाजारी व्हावे लागते हे दुर्दैव
आहे. राजीव गांधी यांच्यानंतर 30 वर्षांनी नरेंद्र मोदींना पूर्ण बहुमत मिळाले. तीन वर्षात एकही प्रश्‍न त्यांनी सोडवला नाही. नोटाबंदी झाल्यानंतर अर्थव्यवस्थेळा बळकटी येईल, अतिरेकी कारवाया थांबतील, अशा घोषणा केल्या. मात्र, परिस्थिती बदलली नाही. लोकांना मोहिनी घालण्याचे काम करून ते मते घेतात आणि नंतर सर्व विसरून जातात. पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किंमती वाढल्या, शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या उपसा सिंचन योजनांच्या वीज बिलात वाढ केली. हे अच्छे दिन आहेत का ? असा प्रश्‍न त्यांनी केला.

सरकारमधील मंत्री म्हणातात तुरीचे नियोजन चुकले. मग तुम्ही तेथे शेतकऱ्यांना मातीत घालायला बसलाय का? तूर विक्रीसाठी आली. त्यावेळी सरकारने खरेदी बंद केली. हे सरकार बेजबाबदार, असंवेदनशील, शेतकरी विरोधी सरकार आहे. जिल्हा बॅंकेत लाखो रुपयांच्या नोटा पडल्या आहेत. त्याचाही निर्णय नाही. सरकारला त्यासाठी योग्य भाषेत समजावावे लागेल. त्यासाठी संघर्ष अधिक तीव्र करावा लागणार असून त्यासाठी शेतकऱ्यांनी आम्हाला साथ द्यावी.' 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख