आमदार संगीता ठोंबरे यांचा संक्रांतीच्या "हळदी कुंकवा'तून संपर्क

लातूर येथील प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठल लहाने आणि बीडचे प्राचार्य डॉ. विवेक मिरगणे यांचे केजमध्ये महिलांसाठी प्रबोधनात्मक व्याख्यान झाले. याला केजमध्ये प्रतिसाद मिळाला. त्यानंतर त्यांनी बीड व अंबाजोगाई तालुक्‍यातील महिलांसाठी हळदी- कुंकवाचा कार्यक्रम ठेवला.
आमदार संगीता ठोंबरे यांचा संक्रांतीच्या "हळदी कुंकवा'तून संपर्क

बीड : कुठल्याही सण, उत्सव पारंपारिक रितीने साजरे करणाऱ्या आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांमध्ये मिसळणाऱ्या केजच्या आमदार संगीता ठोंबरे यांनी ही मकर संक्रांतीचे हळदी - कुंक आणि संगीत मैफील आयोजित करुन साजरी केली. तीन दिवस चाललेल्या त्यांच्या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. 

लातूर येथील प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठल लहाने आणि बीडचे प्राचार्य डॉ. विवेक मिरगणे यांचे केजमध्ये महिलांसाठी प्रबोधनात्मक व्याख्यान झाले. याला केजमध्ये प्रतिसाद मिळाला. त्यानंतर त्यांनी बीड व अंबाजोगाई तालुक्‍यातील महिलांसाठी हळदी- कुंकवाचा कार्यक्रम ठेवला.

यामध्ये सहभागी महिलांसाठी हळदी - कुंकवाबरोबर हिंदी - मराठी सदाबहार गाण्यांचे कार्यक्रम ठेवले होते. आलेल्या प्रत्येक सुवासिनींशी हसतमुखाने संवाद साधत संगीता ठोंबरे यांनी हळदी - कुंकू लावून त्यांनावाणही दिले. यावेळी आलेल्या महिलाही प्रेमाने संगीता ठोंबरे यांना हळदी - कुंकू लावत होत्या. त्यामुळे त्यांचे ललाटही हळद - कुंकवाने माखून गेले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com