संगमनेरच्या 'त्या' भागातील लोकांकडून फळे घेणारे धास्तावले!

संगमनेरमध्ये आता काळजी वाढली आहे. विनाकारण कोणीही फिरताना आढळून आल्यास त्याचे वाहन जप्त करण्यात येईल
sangamner
sangamner

संगमनेर (नगर): संगमनेरमधील दोन जण कोरोना विषाणुबाधीत असल्याचे आज स्पष्ट झाल्याने ते राहत असलेल्या नायकवाडपुरा भागातील लोक धास्तावले आहेत. त्या भागातील अनेक लोक फळविक्रीचा व्यवसाय करतात. त्यामुळे त्यांच्याकडून फळे घेतलेल्या लोकांची आता काळजी वाढली आहे.

संगमनेरमधून 15 संशयित नागरिकांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पाठवले होते. त्यातील दोघांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लागू केलेल्या लॉकडाऊन, संचारबंदीच्या कालावधीत आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

जामखेड येथे दोन विदेशी नागरिकांसह धार्मिक कार्यक्रमासाठी हजेरी लावलेल्या तालुक्यातील हिवरगाव पावसा व शहरातील तीन प्रभागातून सोमवारी 15 जणांना जिल्हा रुग्णालयात संशयित म्हणून पाठविण्यात आले होते. त्यातील शहरातील नायकवाडपुरा प्रभागातील दोन जण पॉझिटीव्ह असल्याचा अहवाल आज मिळाला. त्यामुळे अद्याप शहर कोरोना संसर्गमुक्त असल्याच्या कल्पनाविश्वात वावरणारे नागरिक भीतीच्या सावटाखाली गेले आहेत. संपूर्ण राज्यात कोरोना रुग्णांची वाढ होत असून, यात आता संगमनेरचीही भर पडली आहे. आज दुपारपासून शहरातील तीन बत्ती चौक ते प्रवरा नदीवरील पुलापर्यंतचा सर्व भाग सिल करण्यात आला आहे. प्रशासकिय अधिकारी, आरोग्य विभाग व पोलिस त्या दोघांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेत आहेत. या परिसरातील अनेकजण शहराच्या विविध भागात फळे विक्रीचा व्यवसाय करीत असल्याने चिंता वाढली आहे. आज बागवानपुरा या प्रतिबंधीत क्षेत्रातून बाजारात विक्रीसाठी फळे गेल्याचे दृष्य समोर आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत.  

संगमनेरमध्ये आता काळजी वाढली आहे. विनाकारण कोणीही फिरताना आढळून आल्यास त्याचे वाहन जप्त करण्यात येईल. भावी पिढीच्या भल्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे व तहसीलदार अमोल निकम यांनी केले आहे.
 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com