आईला अग्नी देवून प्रांताधिकाऱ्यांनी तडक संगमनेर गाठले! - sangamner sub divisional officer quickly join duty after mothers funeral | Politics Marathi News - Sarkarnama

आईला अग्नी देवून प्रांताधिकाऱ्यांनी तडक संगमनेर गाठले!

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 27 मार्च 2020

कोरोनाच्या पार्श्वभुमिवर शासन आदेशांची काटेकोर अंमबजावणी होण्यासाठी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिस व महसूल विभागाचा समन्वय साधण्याची कसरत सुरु असताना हे संकट ओढवले होते.

संगमनेर (नगर) : कोरोनाचे राष्ट्रीय संकट असताना, मातुःश्रीच्या निधनाची वार्ता धडकली. आयुष्यातील एका हळव्या कोपऱ्याला गमावले असतानाही, राष्ट्रीय कर्तव्याला जागून  ते कर्तव्यावर हजर झाले आहेत.

संगमनेरचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्याबाबतीत ही दुर्दैवी घटना घडली. मंगळवारी (ता. 24) सकाळी 11 वाजता नाशिक येथे त्यांच्या मातुःश्री विमल यांचे निधन झाल्याची बातमी धडकली. कोरोनाच्या पार्श्वभुमिवर शासन आदेशांची काटेकोर अंमबजावणी होण्यासाठी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिस व महसूल विभागाचा समन्वय साधण्याची कसरत सुरु असताना हे संकट ओढवले होते. घराचा एकमात्र आधार असल्याने त्याकडे कानाडोळाही करता येणे शक्य़ नव्हते. आपल्या सहकारी अधिकाऱ्यांना जबाबदारीचे वाटप करुन त्यांनी स्वतःच्या खासगी वाहनातून नाशिक व तेथून रावेर येथे जाऊन मातुःश्रींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. या दरम्यान जबाबदारीच्या भानातून कार्यालयातील सर्व बाबींवरही लक्ष्य होते. शासन, प्रशासन, जनता आणि भावनांची सांगड घालीत त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली. अंत्यसंस्कारानंतरचे धार्मिक विधी करुन ते पुन्हा कर्तव्यावर हजर झाले आहेत. यांच्या या कर्तव्य परायणतेची चर्चा महसूलसह सर्व शासकिय विभागात सुरु आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख