थोरातांविरूद्ध दिल्लीला गेलेले 'ते' पत्र भाजपहस्तकांनीच लिहले! 

संगमनेरातील मुस्लिम समाजाने कोणताही भेदभाव न करणाऱ्या आमदार बाळासाहेब थोरात व काँग्रेस पक्षावर भरभरून प्रेम केले आहे. मात्र त्यांच्याविषयी गैरसमज निर्माण करण्यासाठी भाजपच्या हस्तकाने हे कारस्थान रचल्याचा आरोप अनिल शेख केला आहे.
 muslim community letter
muslim community letter

संगमनेर (नगर) : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमधील मुस्लिम समाजाची फसवणूक केल्याबाबतचे 'ते' पत्र केवळ राजकीय आकसापोटी भाजपहस्तकांनी लिहिल्याचा आरोप काँग्रेसच्या अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष अनिल शेख यांनी केला आहे. याबाबत त्यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकीय समिकरणे बदलली आहेत. काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी पक्ष एकत्र येऊन स्थिर सरकार देण्यासाठी प्रयत्नशिल असल्याने, सत्तेसाठी पक्षांतर केलेल्यांचे मनसुबे धुळीला मिळाले आहेत. या पार्श्वभुमिवर त्यांच्या इशाऱ्यावर संगमनेरातील भाजपाच्या हस्तकांनी प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी मुस्लीम समाजाची तथाकथीत फसवणूक केल्याचे पत्र, मुस्लीम समाजाच्या काही युवकांच्या सह्यांनिशी सोनिया गांधी यांना पाठवले होते. यातून संगमनेरातील मुस्लीम समाजाची निष्कारण बदनामी होत असल्याचे शेख यांनी म्हटले आहे.

संगमनेरातून रवाना झालेले हे पत्र संशोधनाचा विषय आहे. शहरातून जाणाऱ्या कोल्हेवाडी रस्त्याच्या रखडलेल्या दुरुस्तीसाठी या सह्यांची मोहिम असल्याचे सांगत, एका मुस्लीम नेत्याने या परिसरातील व्यावसायीकांच्या सह्या घेत, त्यांचा वापर या निवेदनासाठी केल्याचे एका युवकाने काल सांगितले होते. यावरील अनेक सह्या व मोबाईल क्रमांकही चुकीचे असल्याचे पडताळणीत उघड झाले आहे. त्यामुळे हा पूर्ण राजकीय डाव असून, त्याकडे विशेष लक्ष देण्यासारखे काही नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com