Sangamner Congress Workers Want Balasaheb Thorat To Be Deputy Chief Minister | Sarkarnama

संगमनेरकर पुन्हा खुलले, उपमुख्यमंत्रीपदासाठी सरसावले

मुरलीधर कराळे
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

मागील आठवड्यात थोरात यांची वर्णी उपमुख्यमंत्रीपदी लागणार, हे जवळजवळ निश्चित झाले होते. मात्र, अचानक मुख्यमंत्रीपदाची शपथ भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. तसेच उपमुख्यमंत्रीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार विराजमान झाले. राज्यात झालेल्या या नाट्यमय घडामोडीमुळे संगमनेरकरांचे तोंडचे पाणी पळाले. कारण थोरात यांची उपमुख्यमंत्रीपदाची संधी हुकली होती. त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून घडलेल्या वेगवान घडामोडींकडे राज्याचे लक्ष लागले होते.

नगर : अत्यंत नाट्यमय घडामोडीनंतर अखेर शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे सरकार येत आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ उद्या शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे घेतील. तर उपमुख्यमंत्री कोण होणार, हे गुलदस्तात आहे. या पदावर यापूर्वीच ठरल्याप्रमाणे काँग्रेसच्याच नेत्याची वर्णी लागेल, अशी शक्यता असल्याने आमदार बाळासाहेब थोरात यांचे नाव पुढे येत आहे. त्यामुळे संगमनेरकर पुन्हा खुलले आहेत.

मागील आठवड्यात थोरात यांची वर्णी उपमुख्यमंत्रीपदी लागणार, हे जवळजवळ निश्चित झाले होते. मात्र, अचानक मुख्यमंत्रीपदाची शपथ भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. तसेच उपमुख्यमंत्रीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार विराजमान झाले. राज्यात झालेल्या या नाट्यमय घडामोडीमुळे संगमनेरकरांचे तोंडचे पाणी पळाले. कारण थोरात यांची उपमुख्यमंत्रीपदाची संधी हुकली होती. त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून घडलेल्या वेगवान घडामोडींकडे राज्याचे लक्ष लागले होते. अजित पवार यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे पुन्हा आशा पल्लवीत होऊन उपमुख्यमंत्रीपदी थोरात यांना संधी मिळेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

काल झालेल्या घडामोडींमुळे थोरात यांना संधी मिळणार असल्याचे समजताच संगमनेरमध्ये फटाक्यांची अतिषबाजी झाली. असे असले, तरी प्रत्यक्ष पद मिळेपर्यंत काहीच सांगता येत नाही, असाही सूर काही नेत्यांकडून लावला गेला. आता थोरात यांना मंत्रीपद तर मिळणारच आहे, हे निश्चित असले, तरी त्यांची वर्णी उपमुख्यमंत्रीपदी लागावी, अशी आशा तालुक्यातील जनतेकडून व्यक्त होत आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख