बाळासाहेब थोरातांची उपमुख्यमंत्रीपदाची शक्यता वाढल्याने संगमनेरमध्ये गुलाल तयार

काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यापैकी कोणत्याही एका पक्षाला वगळून सत्ता स्थापन होऊ शकणार नाही. त्यातही काँग्रेसची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. साहजिकच उपमुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे येवू शकते.
Sangamner Ready To Celebrate Appointment of Balasaheb Thorat As Deputry CM
Sangamner Ready To Celebrate Appointment of Balasaheb Thorat As Deputry CM

नगर : राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात सरकार स्थापन होत असताना काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा विधानसभा अध्यक्षपदासाठी पुढे येत आहे. त्यामुळे साहजिकच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे नाव उपमुख्यमंत्रीपदासाठी पुढे येऊ लागले आहे. या वार्तेमुळे संगमनेरकर आनंदोत्सवासाठी सरसावले आहेत.

विधानसभा निवडणुकीनंतर सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला सत्ता स्थापन करता आली नाही. शिवसेनेनेही युती तोडल्याने सत्तेचे केंद्र शिवसेनेकडे आले. अंतीम टप्प्यात काँग्रेसने साथ न दिल्यामुळे शिवसेनेलाही सत्ता स्थापन करता आली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने आता सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला बरोबर घेऊन प्रयत्न सुरू केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिवसेनेकडे, तर महत्त्वाची पदे काँग्रेस व राष्ट्रवादीकडे जाणार आहेत. 

काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यापैकी कोणत्याही एका पक्षाला वगळून सत्ता स्थापन होऊ शकणार नाही. त्यातही काँग्रेसची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. साहजिकच उपमुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे येवू शकते. आज मुंबईमध्ये झालेल्या राजकीय घडामोडींतून थोरात यांचेच नाव या पदासाठी पुढे आल्याचे समजताच संगमनेरकरकर सरसावले आहेत. 

संगमनेरकरांसाठी अभिमानाचा क्षण : दुर्गा तांबे

उपमुख्यमंत्रीपद थोरात यांना मिळणार असल्याची शक्यता वाटते. हा संगमनेरकरांसाठी अभिमानाचा क्षण ठरेल. थोरात यांनी यापूर्वी कृषी, शिक्षण, महसूल अशा खात्यांचे मंत्री म्हणून राज्यात महत्त्वाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. त्यामुळे राज्यात संगमनेरमधील सहकारी संस्था राज्यात अव्वल आहेत. त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची संधी मिळाल्यास राज्याला त्यांचा चांगला फायदा होईल. तसेच हा क्षण संगमनेरच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल, अशी प्रतिक्रिया संगमनेर नगरपालिकेच्या अध्यक्षा व थोरात यांच्या भगिणी दुर्गा तांबे यांनी 'सरकारनामा' शी बोलताना दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com