sangali zp politics | Sarkarnama

सांगलीत भाजप-सेनेचे जमले! 

सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 21 मार्च 2017

सांगली : राज्यभरातील जिल्हा परिषद निवडणुकांत शिवसेना आणि भाजपचे फाटले असताना सांगलीत मात्र हे दोन्ही पक्ष एकत्रित आले. त्यामुळे कॉंग्रेस राष्ट्रवादीचे
सत्तास्थापनेचे स्वप्न हवेत विरले. 

सांगली : राज्यभरातील जिल्हा परिषद निवडणुकांत शिवसेना आणि भाजपचे फाटले असताना सांगलीत मात्र हे दोन्ही पक्ष एकत्रित आले. त्यामुळे कॉंग्रेस राष्ट्रवादीचे
सत्तास्थापनेचे स्वप्न हवेत विरले. 

भाजपची सदस्यसंख्या सर्वाधिक असलीतरी स्वबळावर सत्ता स्थापन करणे त्यांना शक्‍य नव्हते. त्यामुळे आघाड्यांशी त्यांची बोलणी सुरू होती. दुसऱ्या बाजूला स्थानिक आघाड्या व शिवसेनेला बरोबर घेऊन सत्ता स्थापनेचा प्रयत्न कॉंग्रेस राष्ट्रवादीकडून सुरू होता. मात्र अखेरच्या क्षणी भाजप व शिवसेनेतील बेबनाव संपला.त्यामुळे मंगळवारी झालेल्या अध्यक्ष- उपाध्यक्ष निवडीत भाजप सेनेला यश मिळाले. अध्यक्षपदासाठी भाजपच्या संग्रामसिंह देशमुख यांना 35 मते मिळाली. कॉंग्रेसच्या सत्यजित देशमुख यांना 25 मते मिळाली. उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेचे सुहास बाबर विजयी झाले. राष्ट्रवादीच्या चंद्रकांत पाटील यांना 25 मते मिळाली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख