उद्धव ठाकरेंना शुभेच्छा : राष्ट्रवादीच्या सानेंच्या की फक्त कार्यकर्त्यांच्या ? 

उद्धव ठाकरेंना शुभेच्छा : राष्ट्रवादीच्या सानेंच्या की फक्त कार्यकर्त्यांच्या  ? 

पिंपरीः पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदाचा नुकताच राजीनामा दिलेले दत्ताकाका साने यांच्या नावे त्यांच्या फोटोसह त्यांच्या कार्यकर्त्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्तअभिष्टचिंतनाची पोष्ट फेसबुकवर शनिवारी टाकली . अन काका शिवसेनेत प्रवेश करणार की  नाही याबाबत  जोरदार चर्चा रंगली. 

मात्र, उद्या (ता.28) पुण्यात पक्षाच्या शहरातील विधानसभा इच्छूकांच्या मुलाखतीनंतरच यासंदर्भातील चित्र स्पष्ट होणार आहे.जर, काका शिवसेनेत गेले,तर शहरातील व त्यातही भोसरीतील राजकारणाला कलाटणी मिळणार आहे. तसेच राज्यभरातील शिवसेना,भाजप प्रवेशाचे लोणही पिंपरी-चिंचवडपर्यंत येणार आहे.

भोसरीतून विधानसभेला तिकिट मिळणार नसल्याची कुणकुण लागल्यानेच काकांचे कार्यकर्ते हातातील घड्याळ काढून धनुष्यबाण घेण्याच्या हातघाईवर आल्याचे दिसून आले आहे. मात्र, खुद्द साने यांनी याबाबतचा सस्पेंस कायमच ठेवला नसून, तो वाढविला आहे. त्यामुळे हे त्यांचे प्रेशर टॅक्टिसचे राजकारण,तर नाही ना अशीही चर्चा सुरु झाली आहे. 

विरोधी पक्ष नेतेपदी विधानसभा निवडणुकीपर्यंत राहू देण्याची संधी पक्षाने नाकारल्याने काका नाराज असल्याची चर्चा आहे. त्यात भोसरीतून उमेदवारी देण्याची हमी पक्षाने त्यांना दिलेली नाही. दुसरीकडे अभी नही,तो कभी नही या तयारीत काकांचे कार्यकर्ते असल्याने त्यांनीच ही उचल खाल्ल्याचे समजते.

भोसरीतून विद्यमान आमदार महेशदादा लांडगे यांना भाजपकडून तिकिट जवळपास नक्की आहे.मात्र,युती झाली,तर शिवसेना भोसरी  मतदारसंघावर दावा करून आपल्या ताब्यातील पिंपरीवर ते पाणी सोडतील,असे कळते. तसे झाले व काकांना उमेदवारीचा शब्द मिळाला,तर ते शिवसेनेत प्रवेश करतील,असे त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्याने सरकारनामाला सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com