आणि माझ्यासाठी बाळासाहेबांनी आधी घोषित केलेला उमेदवार बदलला...

 आणि माझ्यासाठी बाळासाहेबांनी आधी घोषित केलेला उमेदवार बदलला...

औरंगाबाद : बाळासाहेबांचा शब्द म्हणजे अंतिम, त्यांनी एकदा कुणाला शब्द दिला की तो कधी बदलत नव्हता, पण माझ्यासारख्या शिवसैनिकासाठी पहिल्यांदा साहेबांनी शब्द बदलला, मला पैठण मतदारसंघातून उमेदवारी दिली. आज साहेबाच्या त्या निर्णयामुळेच मी राजकारणात आहे. 


पैठण मतदारसंघातून 1995 मध्ये मी निवडणुकीची तयारी केली होती. मातोश्रीवर उमेदवार निवडण्याची प्रक्रिया सुरू होती. मी चंद्रकांत खैरेसाहेब, प्रदीप जयस्वाल मुंबईत उमेदवारी जाहीर होण्याची वाट पाहत होतो. मोरेश्वर सावे यांनीही बाळासाहेबाकडे उमेदवारी मागितली होती. आणि एकदिवस "सामना'मधून मोरेश्वर सावे यांनी उमेदवारी जाहीर झाली. सामनात उमेदवारी जाहीर झाली की ती कधीच बदलली जात नाही, त्यामुळे मी निराश झालो होतो. इकडे पैठणमध्ये कार्यकर्ते आक्रमक झाले, मी खैरे साहेब, जयस्वाल मातोश्रीवर बाळासाहेबांना भेटायला गेलो. साहेब मला म्हणाले आधी हा फोन घे, मतदारसंघात कार्यकर्त्यांना शांत राहायला सांग, नाहीतर तुला उमेदवारी देणार नाही. आणि तू निवडून येशील का ? असा थेट सवाल साहेबांनी मला केला. 

शिवसैनिक आणि तुमच्या आशीर्वादाने मी निवडून येईन असा विश्वास साहेबांना दिला. तेव्हा साहेबांनी मोरेश्वर सावे यांना दिलेली उमेदवारी बदलली. सावेंचा बी फॉर्म परत घेतला आणि मला विजयी भव असा आशीर्वाद दिला. साहेबांचा आशीर्वाद आणि शिवसैनिकांच्या कष्टाने मी निवडून आलो. साहेबांनी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरला. विजयी होऊन बाळासाहेबांचे आशीर्वाद घ्यायला पुन्हा मातोश्रीवर गेलो, तेव्हा मॉंसाहेब साहेबांना म्हणाल्या, संदीपान आलाय. मॉं नी माझे औक्षण केले, साहेबानी पाठीवर कौतुकाची थाप मारली आणि पेढा भरवला. माझ्यासाठी साहेबांनी शब्द बदलला, ही जीवनातली मोठी शिदोरी समजतो. साहेबांच्या एका निर्णयामुळे आज मी राजकारणात इथपर्यंत पोहोचलो आहे. 

(शब्दांकन : जगदीश पानसरे )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com