अवैध धंदा सापडला की पोलिस इन्स्पेक्टरची बदली : संदीप पाटील - sandip patil warns police officers | Politics Marathi News - Sarkarnama

अवैध धंदा सापडला की पोलिस इन्स्पेक्टरची बदली : संदीप पाटील

चिंतामणी क्षीरसागर
रविवार, 11 नोव्हेंबर 2018

वडगाव निंबाळकर : ``वाढते अवैध धंदे बंद करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य महत्वाचे आहे. पोलिसांनी दारू धंद्यावर कारवाई केल्यानंतर पंच म्हणुन सुज्ञ नागरिकांनी पुढे आले पाहिजे. न्यायालयात पंचाची भूमिका महत्वाची असते. अवैद्य धंदे चालु असलेल्या भागातील अधीकाऱ्याची बदली करण्यात येईल,`` अशी माहिती पुणे ग्रामिण पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.
 

वडगाव निंबाळकर : ``वाढते अवैध धंदे बंद करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य महत्वाचे आहे. पोलिसांनी दारू धंद्यावर कारवाई केल्यानंतर पंच म्हणुन सुज्ञ नागरिकांनी पुढे आले पाहिजे. न्यायालयात पंचाची भूमिका महत्वाची असते. अवैद्य धंदे चालु असलेल्या भागातील अधीकाऱ्याची बदली करण्यात येईल,`` अशी माहिती पुणे ग्रामिण पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.
 
जिल्ह्यातील प्रत्येक ठाण्यातील ठराविक व्यक्तींचा समावेश असलेल्या एसपी 100 व्हॉट्स अॅप ग्रुप सदस्यांची बैठक मुख्यालयात पार पडली यावेळी मार्गदर्शन करताना पाटील बोलत होते. प्रत्येक ठाण्यातील अडिअडचणी जाणून घेतल्यानंतर सामुदाईक सर्वांच्या प्रश्नांची उत्तरे पाटील यांनी बोलताना दिली. 

अनेकांनी अवैध धंद्याबाबत तक्रारी केल्यानंतर नागरिकांची भूमिका महत्वाची असल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली एखाद्या दारू धंद्यावर पोलीसांनी कारवाई केल्यानंतर येथील नागरीकांनी पंच म्हणुन पुढे आले पाहीजे. न्यायालयात पोलिसांच्या बाजू बरोबरच पंचाची बाजू महत्वपुर्ण असते. पंच ठाम राहीले की दारू व्यावसाईकाला सजा लागु शकते. पंच भक्कम मिळत नसल्याने दारू धंद्यावाल्यांचे फावते, असे त्यांनी सांगितले.

``पंच म्हणुन पुढे या न्यायालयात बाजू मांडा. आपोआप अवैध व्यावसायिकांवर अंकुश येईल. दारु धंद्या बाबत नागरीकांनी सामुदायिक सह्यांची निवेदने दिल्यास पोलीसांकडुन कारवाई निश्चीत होईल. हल्ली दारूच्या परवान्यासाठी पोलिसांची परवानगी लागत नसली तरी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी परवानाधारक दुकानावरसुद्धा पोलिस कारवाई करतील. अवैध धंदे आणि गुन्हेगारीचे कनेक्शन आम्हाला ठाउक आहे. यासाठी प्रत्येक अधिकाऱ्यांना आपल्या भागातील धंदे बंद करण्याच्या सूचना केल्या आहेत. यातुनही धंदे चालु असले आणि वरिष्ठ पातळीवरून कारवाई झाली तर येथील अधिकाऱ्याची बदली केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख