मंदा म्हात्रेंची नाराजी दिसली नाही : संदीप नाईक

संदीप नाईक यांनी आपले चुलत भाऊ सागर नाईक आणि नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवकांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. देशात बदलत असलेल्या परिस्थितीनुसार आपली भूमिका न बदलल्याने शहराचे नुकसान होऊ नये म्हणून आपण भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असे स्पष्टीकरण नाईक यांनी दिले.
मंदा म्हात्रेंची नाराजी दिसली नाही : संदीप नाईक

नवी मुंबई  : माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या आशिर्वाद आणि खंबीर पाठींब्यामुळेच माझा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय सोपा झाला. आमच्या कुटुंबांत मला आणि सागरला निर्णय घेण्याचे गणेश नाईकांनी दिलेल्या स्वातंत्र्यामुळेच मला एवढा मोठा निर्णय सहज घेता आले असे उद्गार संदीप नाईक यांनी 'सरकारनामा'शी बोलताना काढले. आपण कार्यक्रमात आमदार मंदा म्हात्रेंची भेट घेतली. मला त्यांच्यात रुसवा दिसला नाही. त्या आमच्यासोबतच व्यासपीठावर होत्या, असेही संदीप नाईक यांनी यावेळी सांगितले.

संदीप नाईक यांनी आपले चुलत भाऊ सागर नाईक आणि नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवकांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. देशात बदलत असलेल्या परिस्थितीनुसार आपली भूमिका न बदलल्याने शहराचे नुकसान होऊ नये म्हणून आपण भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असे स्पष्टीकरण नाईक यांनी दिले.  मुंबईतील गरवारे सभागृहात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर पहिल्यांदाच संदीप नाईक यांनी 'सरकारनामा'शी बोलताना गेले दोन दिवसांपासून बाळगलेले मौन सोडले.

''मी आधीच दोनवेळा आमदार म्हणून निवडून आल्यामुळे मला राज्यात आणि देशात ओळखतात. त्यामुळे मला स्वतःला खूप काही मोठे होण्यासाठी मी हा निर्णय घेतला असे नाही. मला आजपर्यंत जो नवी मुंबईतील नागरीकांकडून प्रेम मला मिळाला आहे. त्याप्रेमावर खरे उतरायचे आहे. शहरातील उरलेली कामे पूर्णत्वास न्यायची आहेत. चांगले प्रकल्प शहरात आणायचे आहे. शहराचा जो नावलौकीक आजपर्यंत आहे. शहराचे वेगळेपण राज्यात आणि देशात आहे ते वाढवायचे आहे,'' असे प्रतिपादन संदीप नाईक यांनी केले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली देशाची वाटचाल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक प्रतिसाद असतो. कितीही कठीण प्रश्न असेल तरी तो साधा व सोपा करून समाजातील प्रत्येक घटकांना दिलासा देण्याची त्यांची कार्यपद्धती ही नवी मुंबईच्या विकासासाठी मला पूरक वाटल्याने आता भाजपमध्ये काम करणे सोपो जाईल असा विश्‍वास नाईक यांनी व्यक्त केला. तसेच भाजपमध्ये राहून नवी मुंबईतील सर्वसमावेशक गावे, झोपडपट्टी व शहराचा विकास करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करण्याची आपली तयारी असल्याचे संदीप नाईक यांनी सांगितले. 

2014 ला मी गणेश नाईकांच्या विचाराने नेतृत्वाखाली व मार्गदर्शनानुसारच विधानसभा निवडणूक लढली. मला यात यश मिळाले. नंतर गणेश नाईकांच्या विचाराने आम्ही महापालिका निवडणूक लढली. यातही आम्ही 52 नगरसेवक व 5 अपक्ष नगरसेवक निवडूण आणू शकलो. म्हणजे आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न केले. परंतु,आता देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे. यात आपले शहर कुठे मागे पडू नये. तसेच आपली राजकीय भूमिका न बदलता आपल्या शहराला वेठीस धरले जाऊ नये. असे भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे आपल्यावर होत असलेल्या टीकेला प्रत्युतर देताना संदीप नाईक यांनी स्पष्टीकरण दिले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com