बीड पंचायत समिती ताब्यात घेण्यासाठी  संदीप क्षीरसागरांची फिल्डिंग 

पंचायत समितीमध्ये सत्तांतर करण्यासाठी आमदार संदीप क्षीरसागर यांनी जोर लावला आहे. त्यांच्या आघाडीच्या सदस्यांसह इतर सदस्यांना गळाला लावण्यात त्यांना यश आले आहे.
Sandip kshirsagar  deployed fielding to take over Beed Panchayat Samiti
Sandip kshirsagar deployed fielding to take over Beed Panchayat Samiti

बीड : शिवसंग्राम, शिवसेना, भाजप आणि तत्कालीन राष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर यांच्या गटाच्या सदस्यांना सोबतीने असलेली बीड पंचायत समितीवरील सत्ता घालविण्यासाठी संदीप क्षीरसागर यांनी जोर लावला आहे. बहुमताएवढ्या सदस्यांना त्यांनी सहलीवर पाठविल्याची खात्रीशीर माहिती आहे.


16 सदस्य संख्या असलेल्या बीड पंचायत समितीवर सध्या शिवसंग्रामच्या मनीषा कोकाटे सभापती, तर शिवसेनेचे ऍड. मकरंद उबाळे उपसभापती आहेत. आता खुल्या प्रवर्गासाठी सभापतीपदाचे आरक्षण निश्‍चित झाले आहे. 


दरम्यान, त्यावेळी  आमदार संदीप क्षीरसागर यांनी काकू-नाना विकास आघाडीच्या माध्यमातून पंचायत समिती निवडणूक लढविली होती. मात्र, त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसंग्राम, शिवसेना, तत्कालीन राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षीरसागर व भाजप अशी युती झाली होती. 

नंतर पंचायत समितीच्या कारभारावरून उपसभापती मकरंद उबाळे यांनी राजीनामाही दिला होता. दरम्यान, पदाधिकाऱ्यांचा अडीच वर्षांचा कालावधी संपल्यानंतर पुढील निवडी 30 डिसेंबरला होणार आहेत. 


पंचायत समितीमध्ये सत्तांतर करण्यासाठी आमदार संदीप क्षीरसागर यांनी जोर लावला आहे. त्यांच्या आघाडीच्या सदस्यांसह इतर सदस्यांना गळाला लावण्यात त्यांना यश आले आहे. सत्तास्थानेसाठी नऊ सदस्यांची गरज असून क्षीरसागर गटाचे दहा सदस्य सहलीवर गेले आहेत.


शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी राज्यात महाविकास आघाडी झाली असली तरी स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीशी आघाडी नसल्याची घोषणा केली. त्यांच्या पत्नी पंचायत समिती सदस्या आहेत. आता त्यांच्यासोबत त्यांच्याच पक्षाचे सर्व सदस्य राहिलेत का? हे पाहणेदेखील महत्वाचे आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com