देशमुखांनी शिखंडी सारखे वार न करता मर्दासारखे लढावे : संदीप जोशी

विरोधकांनी शिखंडी सारखे वार न करता मर्दासारखे लढावे.-मुख्यमंत्र्यांचे निवडणुक प्रतिनिधी संदीप जोशी
Deshmukh -Fadnavis
Deshmukh -Fadnavis

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अर्जावर तथ्यहिन आक्षेप घेत, निव्वळ प्रसिद्धीसाठी गदारोळ घातला आहे. निकालानंतर कॉंग्रेस पक्षातील उमेदवाराची जमानतही जप्त होणार असल्याची कल्पना असल्याने, त्यांनी आता रडीचा डाव खेळण्यास सुरूवात केली आहे.

  परंतु, विरोधकांनी शिखंडी सारखे वार न करता मर्दासारखे लढावे, असा पलटवार मनपा सत्तापक्ष नेते व मुख्यमंत्र्यांचे निवडणुक प्रतिनिधी संदीप जोशी यांनी देखमुखांच्या आरोपांचे स्पष्टीकरण देतांना पत्रकार परिषदेत केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उमेवारी अर्जावर आक्षेप घेऊन अर्ज अवैध असल्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी, अशी मागणी आशिष देशमुख यांनी केली होती. उमेदवारी अर्जावरील नोटरीचा कालावधी संपुष्टात आल्याचे पुरावे देशमुखांनी निवडणूक अधिकाऱ्यासमोर सादर केले होते.   

त्यावर जोशी म्हणाले, उमेदवारी अर्जावरील नोटीरीचा स्टॅप हा 28 डिसेंबर 2018 चा आहे. परंतु, त्यानंतरच, नोटरीला 29 डिसेंबर 2023 पर्यंत असे पाच वर्षाचे एक्‍सटेंशन देण्यात आले आहे. अर्थात, नोटरी ही व्हॅलिड आहे. मुख्यमंत्र्यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आल्यानंतर यासंदभार्तील सुनावणी झाली. 

 त्यानंतर निवडणुक अधिकाऱ्यांनी देशमुखांचे सर्व आरोप रद्द ठरवत मुख्यमंत्र्यांचा अर्ज वैध ठरविला. देशमुखांनी केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आरोप करून निवडणुकीच्या तोंडावर वातावरण निर्मिती केली आहे.

दरम्यान, देशमुखांकडे असेलेली कागदपत्रे ही चोरी करून मिळविली असतील किंवा चुकीच्या मार्गाने प्राप्त केली, याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचेही जोशींनी यावेळी सांगितले.

पत्रकार परिषदेला महापौर नंदा जिचकार, भाजपा शहराध्यक्ष प्रवीण दटके, अविनाश ठाकरे, किशोर वानखेडे आदींची उपस्थिती होती.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com