आदित्य ठाकरेंना पर्यावरणाविषयी किती तळमळ ! संदीप देशपांडेंचा टोला 

आदित्य ठाकरे यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर पर्यावरणाशी संबंधित समस्यांवर अधिक भर दिला होता.
Deshpande taunts Thackeray
Deshpande taunts Thackeray

मुंबई  : युवा सेनाप्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर  दादर परिसरात प्लास्टिक क्रशिंग यंत्र बंद पडल्यावरून मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी खरमरीत टीका  केली आहे .      

आदित्य ठाकरे यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर पर्यावरणाशी संबंधित समस्यांवर अधिक भर दिला होता. यादरम्यान त्यांनी स्वतः पालिका मुख्यालय आणि दादर परिसरात प्लास्टिक क्रशिंग यंत्र सुरू करत त्याचे उद्‌घाटनही केले होते; मात्र यातील काही यंत्रे बंद आहेत, तर काही चक्क बेपत्ता आहेत.

याच मुद्यावर मनसेने आदित्य ठाकरे यांना लक्ष केले आहे . पालिका आणि राज्यात शिवसेनेची सत्ता आहे. सत्ताधारी पक्षातील युवराजांचा हा 'ड्रीम प्रोजेक्‍ट' होता; मात्र त्यांनी उद्‌घाटन केल्यानंतर काही दिवसांतच यंत्रे  बंद पडली. त्याची माहिती आदित्य यांनी घेतलेली दिसत नाही. यावर आम्ही ट्विट करून त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता; मात्र काहीही फायदा झाला नाही. यावरून आदित्य यांना पर्यावरणाविषयी किती तळमळ आहे हे स्पष्ट दिसते, असा टोला मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.  

आदित्य यांच्या पुढाकाराने मुंबईत प्लास्टिक क्रशिंग यंत्रे बसवण्याचा निर्णय दीड वर्षांपूर्वी घेण्यात आला. खासगी कंपनीच्या मदतीने सीएसआर फंडाचा वापर करत पालिका मुख्यालय आणि दादरमधील शिवाजी पार्क परिसरात दोन यंत्रे लावण्यात आली. पालिकेच्या माध्यमातून अशी 500 यंत्रे सुरू करणार असल्याची घोषणाही आदित्य यांनी उद्‌घाटनानंतर केली होती; मात्र तत्कालीन पालिका आयुक्त अजोय मेहता हे यासाठी फारसे उत्सुक नसल्याने हा प्रकल्प बासनात गुंडाळण्यात आला.

पालिका मुख्यालयात लावण्यात आलेले यंत्र काही दिवसांतच गायब झाले, तर शिवसेना भवनापासून हाकेच्या अंतरावरील शिवाजी पार्कच्या प्रवेशद्वाराजवळ बसवण्यात आलेले यंत्र दीड वर्षांपासून बंदच आहे. बंद यंत्र आणि आदित्य यांच्या नावाचा फलकही तिथे तसाच आहे. आता तो परिसर मद्यपींचा अड्डा बनला आहे. त्यामुळे पर्यावरणावर भरभरून बोलणाऱ्या आदित्य यांनी स्वतः सुरू केलेल्या प्रकल्पांची माहिती घेणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com