संध्यादेवी कुपेकरांचं ठरलं, राष्ट्रवादी सोडणार; मुहूर्त 10 ऑगस्टचा?

गेला महिनाभर श्रीमती कुपेकर राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडणार, अशी चर्चा सुरू आहे. 'राष्ट्रवादी'ने नुकत्याच इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यात श्रीमती कुपेकर यांनी आपण लढणार नसल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले. त्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे.
संध्यादेवी कुपेकरांचं ठरलं, राष्ट्रवादी सोडणार; मुहूर्त 10 ऑगस्टचा?

कोल्हापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात जाण्याचे राज्यातील लोण कोल्हापुरातही पसरण्याची शक्‍यता असून, चंदगडच्या 'राष्ट्रवादी'च्या आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर यांचेही राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडण्याचे ठरले आहे. येत्या 10 ऑगस्टपर्यंत कार्यकर्त्यांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात येणार आहे. श्रीमती कुपेकर यांनी 'राष्ट्रवादी'ला रामराम केलाच तर त्यांच्या कन्या डॉ. नंदिनी बाभूळकर भाजपच्या उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याची शक्‍यता आहे. 

गेला महिनाभर श्रीमती कुपेकर राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडणार, अशी चर्चा सुरू आहे. 'राष्ट्रवादी'ने नुकत्याच इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यात श्रीमती कुपेकर यांनी आपण लढणार नसल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले. त्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे.

भाजप-शिवसेना युती झाली तर हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आहे. सध्या जिल्ह्यातील दहापैकी सहा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आहेत. उर्वरित चारपैकी दोन मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. उर्वरित दोन्हीही जागा भाजप आपल्याकडे घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आघाडीवर आहेत. त्यातून ही जागा भाजपला मिळाली तर श्रीमती कुपेकर यांच्या कन्या डॉ. बाभूळकर या उमेदवार असतील. 

अलीकडचे भाजपमध्ये गेलेले माजी मंत्री भरमू पाटील यांनी विनाअट प्रवेश केला आहे; तर गोपाळराव पाटील यांना निवडणुकीपेक्षा 'दौलत'मध्ये जास्त रस आहे. डॉ. बाभूळकर यांचे सासर नागपूर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही गाव नागपूर आहे. फडणवीस व बाभूळकर कुटुंबाचे चांगले संबंध आहेत. त्यातून 15 दिवसांपूर्वी डॉ. बाभूळकर यांनी फडणवीस यांची भेटही घेतली आहे. त्यामुळेच श्रीमती कुपेकर यांच्यासह त्यांना मानणारा या मतदारसंघातील गट भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

 कोल्हापुरात रविवारी (ता. 4) आल्यानंतर 10 ऑगस्टपर्यंत कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार आहे. मी मुख्यमंत्र्यांना 15 दिवसांपूर्वी भेटले. एव्हीएच प्रकल्पाविरोधात आंदोलनादरम्यान दाखल असलेले गुन्हे मागे घेण्याबाबत त्यांच्याशी चर्चा झाली - डाॅबाभूळकर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com