Sand Mafia groomed by Gadakh : MLA Balasaheb Murkute | Sarkarnama

वाळू तस्करांना गडाखांनी मोठे केले :  आ. बाळासाहेब मुरकुटे

सरकारनामा
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

मी आमदार झाल्यापासून गेल्या चार वर्षात कोणत्याही अधिकाऱ्यावर चुकीच्या कामासाठी दडपण आणले नाही. आणि कोणत्याही अवैध धंद्यासाठी हस्तक्षेप केलेला नाही.

-आ. बाळासाहेब मुरकुटे

 

नगर : "वाळू तस्करांशी माझा कसलाही संबंध नाही. मी कोणत्याही तस्कराला मदत करीत नसतो. वाळू तस्करीत माझे कुणी कार्यकर्तेही गुंतलेले नाहीत,'' असे प्रतिपादन नेवासा मतदारसंघाचे भाजप आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केले.

आमदार मुरकुटे म्हणाले, "मी आमदार झाल्यापासून गेल्या चार वर्षात कोणत्याही अधिकाऱ्यावर चुकीच्या कामासाठी दडपण आणले नाही. आणि कोणत्याही अवैध धंद्यासाठी हस्तक्षेप केलेला नाही.''

तालुक्‍याच्या राजकारणातून माझे विरोधक खोटे आरोप करीत आहेत, असे सांगत श्री. मुरकुटे म्हणाले, " शंकरराव गडाख यांच्या आमदारकीच्या काळातच तालुक्‍यामध्ये वाळू तस्करीच्या घटना वाढू लागल्या हे सर्वांनाच माहिती आहे. गडाखांच्या कार्यकाळात 8-10 टक्के वाळूची रॉयल्टी भरायची आणि उर्वरित तशीच न्यायची हे प्रकार वाढीस लागले. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी, फार्म हाऊससाठी आणि संस्थेसाठी कुणी किती वाळू उचलली आणि कशी उचलली हे तालुक्‍यात सर्वांना माहीत आहे. आमचे काम चांगले चालले असल्याने अस्वस्थ विरोधक माझ्याविषयी अपप्रचार करीत आहेत.'' 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख