sand mafia attack sdo in shirpur | Sarkarnama

वाळू माफियांकडून शिरपूरला  प्रांताधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला 

सचिन पाटील
गुरुवार, 11 जुलै 2019

शिरपूर : येथील प्रांताधिकारी डॉ. विक्रमसिंह बादल यांनी वाघाडी टी पॉइंटवर अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्‍टर आज पकडले. ते सोडून द्यावे, अशी मागणी वाहतूकदारांनी केली. ती प्रांताधिकारी बादल यांनी फेटाळून लावली. त्याचा राग आल्याने संशयित पाच ते सहा वाहतूकदारांनी प्रांताधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केला. त्यांना बेदम मारहाण केली. त्याचे तीव्र पडसाद धुळे जिल्ह्यात उमटले असून निषेधार्थ महसूल कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. 

घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी राहुल रेखावार, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ शिरपूर पोलिस ठाण्यात पोहोचले. आमदार काशिराम पावरा, नगरसेवक तपन पटेल यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक विश्‍वास पांढरे यांच्याशी चर्चा करत संशयितांवर कठोर कारवाईची मागणी केली. तशीच मागणी महसूल कर्मचारी व संघटनेने केली आहे. 

संशयितांनी प्रांताधिकाऱ्यांच्या वाहनावर चढून धुमाकूळ घातला. त्यांना अधिकाऱ्यांनी प्रतिकार करताच संशयित पसार झाले. जखमी प्रांताधिकारी बादल यांना वैद्यकीय तपासणीसाठी शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना गंभीर इजा झाल्याने पुढे धुळे जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. हल्लेखोरांच्या अटकेसाठी महसूल कर्मचारी संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख