Sanatan's Sudhanwa Gondhalekar Has Criminal Record | Sarkarnama

'सनातन'च्या सुधन्वा गोंधळेकरची आहे गुन्हेगारी पार्श्वभूमी : 2000 मध्ये दाखल होता खुनाचा गुन्हा

उमेश घोंगडे
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेत परिसरात त्यावेळी खुनाची घटना घडली होती. 2000 सालच्या खुनाच्या घटनेत गोंधळेकर याचा पत्ता करंजे पेठ, सातारा असा नमूद करण्यात आला आहे. त्यामुळे त्याचे मूळ गाव सातारा असल्याचे सांगण्यात येत आहे. खुनाच्या घटनेत गोंधळेकर याच्यासोबत आणखी एक आरोपी होता. मात्र या खुनाच्या घटनेबाबत अधिक तपशील पोलिसांकडे मिळत नाही.

पुणे : स्फोटके बाळगणाऱ्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या सुधन्वा सुधीर गोंधळेकर याच्याविरोधात 2000 साली पुण्यात चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. विशेष म्हणजे या खटल्यातून 2003 साली तो निर्दोष सुटला होता. शुक्रवारी मुंबईच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) गोंधळेकर याला ताब्यात घेतल्यनंतर चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात नोंद असलेला 18 वर्षापूर्वीचा त्याचा इतिहास पुढे आला आहे. 

गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेत परिसरात त्यावेळी खुनाची घटना घडली होती. 2000 सालच्या खुनाच्या घटनेत गोंधळेकर याचा पत्ता करंजे पेठ, सातारा असा नमूद करण्यात आला आहे. त्यामुळे त्याचे मूळ गाव सातारा असल्याचे सांगण्यात येत आहे. खुनाच्या घटनेत गोंधळेकर याच्यासोबत आणखी एक आरोपी होता. मात्र या खुनाच्या घटनेबाबत अधिक तपशील पोलिसांकडे मिळत नाही. हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित तसेच राज्यात बॉम्बस्फोट घडविण्याचा कट करणाऱ्या संशयितांशी संबंध असल्याचा संशयावरून मुंबई 'एटीएस'च्या जाळ्यात गोंधळेकर शुक्रवारी सापडला.

गोंधळेकर याला ताब्यात घेतल्यानंतर 'एटीएस'ने आज पुण्यातून अन्य दोघांना ताब्यात घेतले आहे. गोंधळेकर तसेच आज अटक करण्यात आलेल्या दोघांकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे पुण्यातून आणखी काही संशयितांपर्यंत पोचणे पोलिसांना शक्‍य होणार आहे. दरम्यान, गोंधळेकर अथवा या संपूर्ण घटनेबाबत पुणे पोलीस पूर्णपणे अनभिज्ञ असून तपासाला बाधा येईल, असे कारण सांगत मुंबई 'एटीएस'देखील कसलीच माहिती देत नाही. 

सनातन संस्था

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख