वयाच्या 34 व्या वर्षी साना मरिन बनल्या फिनलंडच्या पंतप्रधान 

फिनलंडच्या सत्ताधारी सोशल डेमॉक्रॅटिक पक्षाने (एसडीपी) रविवारी (ता.8) रात्री उशिरा मरिन यांची पंतप्रधानपदी निवड झाल्याची घोषणा केली.
Sana-Marine
Sana-Marine

हेलसिंकी (फिनलंड)    : वयाच्या 34 व्या वर्षी साना मरिन फिनलंडच्या पंतप्रधान झाल्या आहेत .  त्या  जगातील  सर्वांत कमी वयाच्या पंतप्रधान ठरल्या आहेत. त्या व्यवस्थापन शास्त्राच्या पदवीधर आहेत . 

सना मारिन यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1985 चा आहे. त्या सर्वप्रथम 2015 मध्ये खासदार म्हणून निवडून आल्या होत्या.  फिनलंड देशाची लोकसंख्या 53 लक्ष  आहे.  म्हणजे या देशाची लोकसंख्या मुंबई महानगरापेक्षाही कमी आहे . फिनलंड देशाची राजधानी हेलसिंकी आहे .  उत्तर यूरोपात असलेल्या   फिनलंडच्या सिमा स्वीडन , रशिया आणि नॉर्वेला भिडलेल्या आहेत .  


फिनलंडच्या सत्ताधारी सोशल डेमॉक्रॅटिक पक्षाने (एसडीपी) रविवारी (ता.8) रात्री उशिरा मरिन यांची पंतप्रधानपदी निवड झाल्याची घोषणा केली. या आधी त्या सरकारमध्ये ट्रान्सपोर्ट  आणि कम्युनिकेशन विभागाच्या मंत्री होत्या.

मरिन या फिनलंडच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान आहेत. माजी पंतप्रधान ऍन्टी रिने यांनी 3 डिसेंबर रोजी पदाचा राजीनामा दिल्यानंतर काल नव्या पंतप्रधानांची निवड झाली. यासाठी 'एसडीपी'कडून साना मरिन आणि अँटी लिंडमन असे दोन उमेदवार होते. यात मरिन यांना 32, तर लिंडमन यांना 29 मते मिळाली.

"सेंटर पार्टी' पक्षाचे नेते इस्को अहओ हे 1991 फिनलंडच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले होते. त्या वेळी ते 36 वर्षांचे होते. मरिन या त्यांच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान आहेत. जगातील सर्वांत कमी युक्रेनचे 35 वर्षांचे पंतप्रधान ओलेस्की हॉंचारुक हे जगातील सर्वांत कमी वयाचे पंतप्रधान आहेत. त्यांनी 21 ऑगस्ट 2019 रोजी देशाचे नेतृत्व स्वीकारले होते. आता साना मरिन या जगातील सर्वांत कमी वयाच्या पंतप्रधान ठरल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com