शेतकऱ्यांच्या विरोधामुळे समृद्धीचा मुहूर्त टळला : एकनाथ शिंदे  - samrudhi in problem eknath shinde | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

शेतकऱ्यांच्या विरोधामुळे समृद्धीचा मुहूर्त टळला : एकनाथ शिंदे 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

मुंबई : नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गात अनेक अडथळे येत असून शेतकऱ्यांच्या विरोधामुळे या महामार्गाचा मुहूर्त टळला आहे. समृद्धी महामार्गाच्या भूमीपूजनाचा 1 ऑक्‍टोबरचा मुहूर्त टळून तो जानेवारीत होण्याची शक्‍यता आहे असे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

9364 हेक्‍टर जमिनांपैकी फक्त 603 हेक्‍टर जमीन म्हणजेच 6 टक्के जमीन शेतकऱ्यांकडून संपादित करण्यात सरकारला यश आले आहे. 

सरकारने या जमिनींसाठी शेतकऱ्यांना चांगले दर देऊन सुद्धा बहुतांश शेतकरी आपली जमीन देण्यास इच्छुक नाहीत. त्यामुळे अजून पर्यंत शेतकऱ्यांची मनधरणी करण्यास सरकारला नाकीनव येत आहेत. सरकारकडून मिळणाऱ्या मूल्यांकनाबाबतही शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सिन्नर तालुक्‍यातील पाच गावांचा अजूनही या महामार्गाला विरोध असल्याने त्यांच्या अडचणी दूर झाल्यानंतरच जमिनींच्या संपादनाची प्रक्रिया सुरू होईल. अशी एक ना अनेक विघ्न या महामार्गात येत आहेत. 

समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी जमीन संपादित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून आतापर्यंत साडेपाच हजार शेतकऱ्यांनी सुमारे अडीच हजार हेक्‍टर जमीन प्रकल्पासाठी देण्यासाठी संमती दर्शविली आहे. येत्या तीन महिन्यांत प्रकल्पासाठी लागणाऱ्या 90 टक्के जमीन संपादनाचे काम पूर्ण होऊन जानेवारी महिन्यात या प्रकल्पाला सुरुवात होईल, असे शिंदे यांनी सांगितले. 

या प्रकल्पासाठी राष्ट्रीय तसेचआंतरराष्ट्रीय स्तरावरील सुमारे 33 कंपन्यांनी रस दाखवला असून आतंरराष्ट्रीय मानांकानुसार त्यांना टेंडर दिले जाणार आहे. ज्या कंपन्यांचा पूर्व इतिहास असमाधानकारक आहे. त्यांना निवड प्रक्रियेतून वगळले जाणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख