निम्म्या भुसंपादनाने फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्ट 'समृध्दी'चा मार्ग मोकळा

समृध्दी महामार्ग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ड्रिम प्रोजेक्ट आहे. मात्र गेले वर्षभर शेतकरी तसेच राजकीय पक्षांच्या राजकारणाचे टार्गेट ठरला होता. त्यामुळे सातत्याने भुसंपादनात अडथळे येत होते. मात्र आता सुमारे 56 टक्के जमीन संपादीत झाली आहे. त्यामुळे समृध्दीच्या निवादांचा मार्ग मोकळा झाल्याने सरकारला दिलासा मिळाला आहे.
निम्म्या भुसंपादनाने फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्ट 'समृध्दी'चा मार्ग मोकळा

नाशिक : समृध्दी महामार्ग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ड्रिम प्रोजेक्ट आहे. मात्र गेले वर्षभर शेतकरी तसेच राजकीय पक्षांच्या राजकारणाचे टार्गेट ठरला होता. त्यामुळे सातत्याने भुसंपादनात अडथळे येत होते. मात्र आता सुमारे 56 टक्के जमीन संपादीत झाली आहे. त्यामुळे समृध्दीच्या निवादांचा मार्ग मोकळा झाल्याने सरकारला दिलासा मिळाला आहे. 

शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधानंतर नागपूर मुंबई समृध्दी महामार्गासाठी आतापर्यत 56.30 टक्के भूसंपादन करण्यात प्रशासनाला यश आले आहे. त्यामुळे 50 टक्के संपादनानंतर निविदा प्रक्रिया सुरु करण्याचा प्रशासनाचा मार्ग मोकळा झाला. शेतकऱ्यांच्या सर्वाधिक विरोधामुळे राज्यात या मार्गासाठी सर्वात कमी भूसंपादन नाशिक जिल्ह्यात होते. मात्र, आता शासकीय जमिनींसह प्रशासनाने पन्नास टक्क्यांहून आधिक जमिनी संपादनाचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया सुरु करता येणार आहे. 

या मार्गासाठी 75 टक्के पर्यत जमीन संपादन झाल्यास तेथे प्रत्यक्ष कामही सुरु करता येणार आहे. दोन्ही जिल्ह्यात आतापर्यत प्रशासनाने 627 कोटीचा मोबदला दिला आहे. 2845 शेतकऱ्यांकडून 1054 खरेदीखत नोंदविण्यात आली आहेत. जिल्ह्यातील 49 पैकी 42 गावातील कामकाजाला यश आले आहे. नगर जिल्ह्यात 529 शेतकऱ्यांचे 245 खरेदीखत झाले आहे. तेथेही 53 टक्क्यांहून अधिक जमिनीचे संपादन झाले आहे. त्यामुळे नाशिक विभागात समृध्दीच्या कामाला गती येण्याची शक्‍यता वाढली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com