छगन भुजबळ इफेक्‍ट; शिवसेनेचे चुंभळे 'आऊट', कॉंग्रेसचे सकाळे 'इन'

नाशिक बाजार समितीच्या संचालकांनी बाजार समितीच्या सह्यांचे अधिकार संचालक संपतराव सकाळे यांना द्यावेत, असे सर्वांच्या संमतीने पत्रे दिले होते. त्यामुळे छगन भुजबळ पालकमंत्री झाल्यानंतरचा राजकीय इफेक्‍ट म्हणून राज्यातील या सर्वात महत्वाच्या आणि सत्ताकेंद्रात शिवाजी चुंभळे इन तर कॉंग्रेसचे संपत साकळे इन झाले
Shivaji Chumbhle removed Samapt Sakale Appointed on Nashik Market Committee
Shivaji Chumbhle removed Samapt Sakale Appointed on Nashik Market Committee

नाशिक : राज्यातील प्रमुख बाजार समिती असलेल्या नाशिक बाजार समितीचे अकरा संचालक विरोधात गेल्याने सभापती, शिवसेना नेते शिवाजी चुंभळे यांचे अधिकार व पद दोन्ही गेले. चुंभळे हे माजी पालकमंत्री गिरीष महाजन यांचे निकटवर्तीय असल्यानेच त्यांना हे पद मिळाल्याची चर्चा होती. त्यामुळे राज्यातील सत्तांतराचा राजकीय इफेक्‍ट म्हणून या सत्तांतराकडे पाहिले जाते.

श्री. चुंभळे यांना कंत्राटी पद्धतीने नोकरभरती प्रकरणात लाच घेताना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडून गुन्हा दाखल केला व अटक केली. त्यानंतर नाशिक जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समितीचे कलम 45-1 नुसार त्यांचे सभापतिपदाचे आर्थिक व धोरणात्मक निर्णयाचे अधिकार काढून घेतले होते. त्यानंतर चुंभळे यांनी बेकायदेशीरपणे सह्यांचे अधिकार प्राप्त केल्याचे संचालकांचे म्हणणे होते. संचालकांनी बाजार समितीच्या सह्यांचे अधिकार संचालक संपतराव सकाळे यांना द्यावेत, असे सर्वांच्या संमतीने पत्रे दिले होते. त्यामुळे छगन भुजबळ पालकमंत्री झाल्यानंतरचा राजकीय इफेक्‍ट म्हणून राज्यातील या सर्वात महत्वाच्या आणि सत्ताकेंद्रात शिवाजी चुंभळे इन तर कॉंग्रेसचे संपत साकळे इन झाले.

श्री. चुंभळे यांचे अधिकार काढण्यासाठी बाजार समितीच्या दहा संचालकांनी जिल्हा उपनिबंधकांकडे पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार जिल्हा उपनिबंधकांनी चुंभळे यांचे सह्यांचे अधिकार काढून ते संचालक संपतराव सकाळे यांना द्यावेत, अशा आदेशाचे पत्र सचिवांना दिले. हे अधिकार देण्यासाठी मंगळवारी बाजार समितीच्या सभागृहात सभा झाली. या सभेत संचालक शंकरराव धनवटे, तुकाराम पेखळे, रवींद्र भोये, दिलीप थेटे, विश्‍वास नागरे, संजय तुंगार, प्रभाकर मुळाणे, युवराज कोठुळे, ताराबाई माळेकर, श्‍याम गावित यांनी सकाळे यांना अधिकार देण्यासाठी उभे राहून संमती दर्शविली.

छगन भुजबळ यांच्यासोबत पंधरा वर्षे संबंध होते. त्यांच्यावर 'ईडी'ची कारवाई होऊन त्यांना तुरुंगवास सहन करावा लागला. त्यादरम्यान राजकारणात मला विरोधक झाल्याने मला पक्ष सोडावा लागला. मी कोणत्याही पक्षात गेलो तरी प्रामाणिक काम करतो. पण याचा राग मनात ठेवून की काय माझ्याविरुद्ध असे राजकारण केले जात आहे -शिवाजी चुंभळे, सभापती

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com