एकाकी लढलेल्या आवताडेना 54 हजार मते !

..
एकाकी लढलेल्या आवताडेना 54 हजार मते !

मंगळवेढा  :   विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात एकाकी लढलेल्या समाधान आवताडे यांना 54 हजारापेक्षा अधिक मते मिळाली.  पंढरपूरातून अपेक्षित मतदान न झाल्यामुळे अपयश आले असले तरी  ही मते त्यांना भविष्यातील राजकीय गणितासाठी सोयीचा आहेत .  या निवडणूकीतून त्यांचा जनाधार वाढल्याचे दिसून आले.


 गत निवडणूक त्यांनी  शिवसेनेच्या चिन्हावर लढती होती त्यात 40 हजार 910 मते पडली.त्यातील अपयशानंतर त्यांनी दामाजी कारखाना व पंचायत समिती व जिल्हा परिषद सह निम्म्याहून अधिक ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले. अशा परिस्थितीत या निवडणुकीला समोरे जात असताना भाजपाकडून ते दावेदार होते . परंतु जागावाटपात  ही जागा रयत क्रांतीला देवू केली . त्यातून सुधाकर परिचारक यांना संधी दिली.


पण आवताडेना जनतेच्या आग्रहाखातर अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.   स्वतः  प्रचारक होऊ निवडणुकीला सामोरे गेले अशा परिस्थितीत लोकांनी त्यांना दिलेली मते निश्चितच त्यांना भविष्यात राजकीय वाटचालीसाठी फायदेशीर ठरणार आहेत.  परंतु त्यांना भोसे जिल्हा परिषद गटात अपेक्षित मतदान मिळाले नाही.  जिल्हा परिषद सदस्य दिलीप चव्हाण यांच्या सलगर गावात  तसेच पंचायत समिती सदस्या प्रेरणा मासाळ यांच्या हुलजंती गावात देखील मिळाले नाही. 


याशिवाय भोसे पं. समिती सदस्य सुरेश ढोणे यांनी ऐन  निवडणुकीत परिचारक गटात प्रवेश केला.  भोसे तही  त्यांना अपेक्षित मत मिळालेली नाही परंतु यंदाची निवडणूकीत नेत्याविना अपक्ष लढत असताना त्यांच्या प्रचार सभेमध्ये कुठलाही राजकीय नेता अथवा प्रचारक नव्हता . ते स्वतः प्रचारक होऊन निवडणुकीला सामोरे गेले .

मतदारसंघातील वाढती बेरोजगारी व रखडलेले प्रश्‍न यावर त्यांनी फोकस ठेवून प्रचार केला त्यांना या प्रचारातून मारापुर, तामदर्डी, बोराळे, नंदूर , डोणज, लक्ष्मी दहिवडी, भालेवाडी, कचरेवाडी, घरनिकी, पाटकळ,  ममदाबाद(शे), देगाव, ढवळस, मंगळवेढा शहर, मल्लेवाडी, धर्मगाव, गणेशवाडी, बालाजीनगर,कर्जाळ, कात्राळ, कागष्ट, खवे , अकोला, माचणूर, रहाटेवाडी, हिवरगाव, जालीहाळ, मरवडे, जित्ती, बावची, गावात  मताधिक्य मिळाले आहे .


  तर काही गावात ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत.  त्यामुळे या निवडणुकीत जरी अपयशी ठरले असले तरी त्यांची भविष्यात लोकांशी सातत्याने संपर्क ठेवून राहावे लागणार आहे . कारण या पुढच्या काळात मोठ्या सहकारी संस्था व स्थानिक स्वराज्य संस्थेचे राजकारणात या माध्यमातून त्यांना आपल्या गट मजबूत करण्यासाठी त्यांना राजकारणात सक्रिय व्हावे लागणार आहे.


स्वतः उद्योजक असल्यामुळे बेरोजगार तरुणांना उद्योगधंदे च्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करण्याची ताकद असल्यामुळे तालुक्यातील मतदारांनी अवताडेंना मतदान मोठ्या प्रमाणात केले.पण पंढरपूरातून मतदान झाले नाही. परंतु त्यांनी गत विधानसभा निवडणुकीपासून पंढरपुरामध्ये स्वतःचा गट प्रभावी गट निर्माण केला नाही. क्षमता असताना देखील दोन कारखाने, सूतगिरणी व स्थानिक स्वराज्य संस्थेतील कामाच्या , कारखान्याचा काटकसरीचा कारभार व वचनपुर्ती ब्रँडिंग करण्यात अपयश आले.

गत वर्षीच्या तुलनेत वाढलेला जनाधर लक्षात घेता मताधिक्य दिलेल्या जनतेचे आभार व त्या समस्या सोडविण्यासाठी गावभेट दौरा करून जनतेला अंतरावर न ठेवता त्यांच्या संपर्कात राहणार असल्याचे अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांनी भेटावयास आलेल्या  कार्यकत्याला आधार दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com