आणखी एक 'राष्ट्रवादी पूत्र' भाजपच्या गळाला; समीर दुधगावकर यांचा भाजप प्रवेश निश्चित

आणखी एक 'राष्ट्रवादी पूत्र' भाजपच्या गळाला; समीर दुधगावकर यांचा भाजप प्रवेश निश्चित

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील मोठे नेते अॅड. गणेशराव दुधगावकर यांचे चिरंजीव समीर दुधगावकर यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. बुधवारी (20) त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. येत्या 25 किंवा 26 मार्च रोजी त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा मुंबईत होईल असे समीर दुधगावकर यांनी सांगितले.

परभणी : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील मोठे नेते अॅड. गणेशराव दुधगावकर यांचे चिरंजीव समीर दुधगावकर यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे.  बुधवारी (20) त्यांनी  मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. येत्या 25 किंवा 26 मार्च रोजी त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा मुंबईत होईल असे समीर दुधगावकर यांनी सांगितले.

परभणीचे माजी खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते अॅड. गणेशराव दुधगावकर यांचे समीर चिरंजीव आहेत. मागील दोन - तीन वर्षापासून समीर दुधगावकर हे सामाजिक कार्यात सक्रिय झाले होते. त्या आधी ते अमेरिकेत वास्तव्यास होते. तेथे शिक्षण पूर्ण करून ते भारतात आले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातील उद्योगक्षेत्राच चांगले काम केले आहे. एक उच्चशिक्षित तरूण म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. काही दिवसापूर्वीच त्यांनी आपण स्वकर्तूत्वावर राजकीय क्षेत्रात पदार्पन करणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानुसार त्यांनी बुधवारी (ता.20) मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्यसभा सदस्य विनय सहस्त्रबुद्धे यांची भेट घेतली. येत्या 25 किंवा 26 मार्च रोजी ते भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश करणार आहेत.

यासंदर्भात बोलताना समीर दुधगावकर म्हणाले, "माझी राजकीय सुरुवात चांगल्या विचाराच्या पक्षातून व्हावी अशी माझी इच्छा होती. त्यामुळे आपण भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश करत आहोत. परभणीत काही प्रकल्पांच्या मंजुरीचा शब्द आपल्याला मुख्यमंत्र्याकडून मिळाला आहे." यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड. संभाजी पगारे, भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते अनिल जाधव, युवराज दुधगावकर, संदीप राऊत, मयूर पत्रे उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com