तुकाराम मुंढेंना आता समीर भुजबळांकडून अल्टीमेटम! 

अविश्‍वास ठरावाचे वादळ शमल्याने आयुक्त तुकाराम मुंढेंनी आज नियमीत कामाकडे लक्ष वळविले. मात्र, करवाढीच्या विषयावर अद्याप राजकीय वादळ शमण्याची चिन्हे दिसत नाहीत.
तुकाराम मुंढेंना आता समीर भुजबळांकडून अल्टीमेटम! 

नाशिक : अविश्‍वास ठरावाचे वादळ शमल्याने आयुक्त तुकाराम मुंढेंनी आज नियमीत कामाकडे लक्ष वळविले. मात्र, करवाढीच्या विषयावर अद्याप राजकीय वादळ शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. ''नाशिककरांवरील करवाढ ही अन्याय व धुळफेक आहे, संपुर्ण करवाढ मागे घ्या अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस महापालिकेवर मोर्चा नेईल," असा इशारा माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिला आहे. 

यासंदर्भात पक्षाचे सर्व पदाधिकारी, नेत्यांच्या शिष्टमंडळाने विभागीय महसुल आयुक्त राजाराम माने यांची भेट घेतली व या प्रश्‍नावर चर्चा केली. केंद्रात आणि राज्यात भाजप शिवसेनेची सत्ता आहे. ''राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नाशिक शहर दत्तक घेतले आहे. त्यासाठी त्यांनी मर्जीतील अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे. जर मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील अधिकारी चांगले काम करत नसतील तर त्यांचे गाऱ्हाणे मुख्यमंत्री व पालकमंत्र्याकडे मांडायला हवे होते. मात्र, सत्ताधारी भाजपने नागरिकांना संपूर्ण नाशिक शहराला वेठीस धरण्याचे काम केले.  सत्ताधारी भाजपने प्रश्न सोडविण्याऐवजी जनतेसमोर प्रश्न निर्माण केले. जनतेला अडचणीत आणले आहे. आयुक्तांवर अविश्वास आणून जनतेला वेठीस धरण्याचे काम केले आहे. ही नाशिककरांच्या डोळ्यात धूळफेक करुन जनतेची दिशाभूल केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आम्ही त्याचा तीव्र निषेध करतो. स्मार्ट सिटी आणि शहराच्या विकासासाठी एखादा अधिकारी किंवा सत्ताधारी चांगले काम करत असेल तर त्याला आमचा विरोध नाही. मात्र, शहराचा विकास करत असतांना अधिकारी व सत्ताधाऱ्यांकडून जनतेला वेठीस धरण्याचे काम होऊ नये," असे यावेळी सांगण्यात आले. 

'नाशिककरांवरील अन्यायकारक करवाढ सरसकट रद्द करावी. या प्रश्नांबाबत शासनस्तरावर हस्तक्षेप करून नागरिकांना दिलासा द्यावा. करवाढ सरसकट रद्द न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र स्वरूपाचा मोर्चा काढण्यात येईल,' असा इशारा यावेळी देण्यात आला. माजी खासदार देविदास पिंगळे, प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब महाले, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, माजी आमदार जयवंतराव जाधव, जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते गजानन शेलार, व्यापारी बॅंकेचे संचालक निवृत्ती अरिंगळे, बाळासाहेब कर्डक, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 

तुकाराम मुंढे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com