Sameer Bhujbal agitation for onion prices | Sarkarnama

कांदयांचे दर कोसळल्याने समीर भुजबळांनी मुंबई महामार्ग बंद पाडला 

सरकारनामा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

नाशिक :  शेतकऱ्यांचा कांदा, शेतमाल कवडीमोल भावाने विकला जात आहे. खर्चही वसुल होत नाही .  भाजप-शिवसेना युती सरकारने हस्तक्षेप करावा. हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने समीर भुजबळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी मुंबई महामार्गावरील चांदवड चौफुलीवर मोठा रास्ता रोको केला. 

रस्त्यावर कांद्याच्या गोण्या ओतल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नावर पक्ष सक्रीय झाल्याचे चित्र दिसले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या या आंदोलनाने पोलिस व प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा परिसर असल्याने आधीच नाराज असलेले शेतकरीही त्यात मोठ्या संख्येने सहभागी झाले. 

कांद्याचे निर्यात धोरणांबाबत भाजप-शिवसेना युती सरकारच्या धरसोड वृत्तीमुळेच जागतिक बाजारपेठेत भारतीय कांद्याला मागणी कमी झाली आहे. कांद्याला कवडीमोल किंमत मिळत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. 

त्यामुळे भाजप-शिवसेना युती सरकारने तातडीने कांदा, टोमॅटो यांच्यासह सर्व शेतमालाला हमीभाव जाहीर करून दिलासा द्यावा अन्यथा अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिला. 

रास्ता रोको आंदोलनामध्ये आमदार नरहरी झिरवाळ, माजी आमदार जयंत जाधव, कार्याध्यक्षा डॉ. भारती पवार, विष्णुपंत म्हैसधुणे, डॉ. सयाजी गायकवाड, बाळासाहेब कर्डक, ऍड.रविंद्र पगार, प्रेरणा बलकवडे, पुरुषोत्तम कडलग, यशवंत शिरसाठ, राजेंद्र जाधव, विजय पवार, डॉ. योगेश गोसावी, रामा पाटील, शहाजी भोकनळ, दत्तात्रय माळोदे, अरुण मेढे, विलास सानप आदींची भाषणे झाली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख