बाजार समितीचा कारभार नीट करा, अन्यथा मला लक्ष घालावे लागेल - संभाजीपाटील निलंगेकर

 बाजार समितीचा कारभार नीट करा, अन्यथा मला लक्ष घालावे लागेल - संभाजीपाटील निलंगेकर

लातूर : देशात डाळीचा भाव काढणारा बाजार म्हणून लातूर उच्चत्तम कृषि उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डाची ओळख आहे. तसेच राजकीयदृष्ट्या देखील या मार्केट यार्डाला महत्व आहे. इथून एखादा निर्णय घेतला गेला तर त्याचे परिणाम ग्रामीण भागात दिसत असतात. अशा या मार्केट यार्डात पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी शुक्रवारी जाहीर सभा घेतली. बाजार समितीचा कारभार नीट करा अन्यथा आम्हाला लक्ष घालावे लागेल असा इशाराच त्यांनी अप्रत्यक्षरित्या आमदार अमित देशमुख यांना दिल्याचे बोलले जाते. 

लातूर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी मार्केट यार्डात सभा झाली. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. लातूरची ओळख ही कोण्या एका राजकीय व्यक्तीमुळे देशात झाली नाही तर येथील व्यापारी, शेतकरी, कष्टकरी यांच्या परिश्रमामुळे झाली आहे. या बाजारपेठेचा जो निर्णय असतो तोच जिल्ह्याचा निर्णय असतो. या बाजार समितीवर कॉंग्रेसची सत्ता आहे. पाच वर्ष आम्ही कधीच हस्तक्षेप केला नाही. पण येथील सभापती बाहुला बनला आहे. शेतकऱ्यांचे, व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडवले जात नाहीत. एक महिन्याची संधी देतो, कामात सुधारणा करा, शेतकरी, व्यापारी, हमालांना त्रास होणार असेल तर तर तुमच्याकडे पहावे लागेल अशा शब्दात निलंगेकरांनी सुनावले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com