संभाजीराव निलंगेकरांनी केली आजोबांच्या प्रकृतीची विचारपूस 

निवडणुकीच्या काळात त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली असती तर त्या प्रसंगाला राजकीय वळण मिळून त्याचे राजकारण झाले असते. -संभाजीराव पाटील निलंगेकर
nilangekars
nilangekars

निलंगा :   गेल्या काही दिवसापासून राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रकृतीच्या कारणावरून आजारी असल्याचे वृत्त पूर्ण जिल्हात पसरले होते.  निवडणुकीच्या काळात त्यांच्यावर लातूर येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

डिस्चार्ज घेऊन निलंगा येथे घरी आल्यानंतर रविवारी ता. 27 रोजी खुद्द पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर व त्यांच्या पत्नी प्रेरणाताई पाटील निलंगेकर यांनी सपत्नीक दुपारच्या सुमारास अशोक बंगल्यावर जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली व दिवाळीनिमित्त शुभ आशीर्वाद घेतले. 

राजकारणातील जेष्ठ नेतृत्व माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाची व मार्गदर्शनाची राज्याला व जिल्ह्याला गरज असून त्यांची प्रकृती चांगली राहावी अशी प्रार्थना आपण केली असल्याची माहीती पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी  दिली. 

याबाबतची माहिती देण्यासाठी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन माहीती दिली. ते म्हणाले की, निवडणुकीच्या काळात त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली असती तर त्या प्रसंगाला राजकीय वळण मिळून त्याचे राजकारण झाले असते. म्हणून आपण निवडणुकीच्या काळात त्यांची प्रकृती ठीक नसतानाही भेट घेण्याचे टाळले व त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांच्या सतत संपर्कात राहून त्यांना अधिक चांगले उपचार करण्यासाठी सांगितले होते. 

ते पुढे म्हणाले की, रविवारी  आपण प्रत्यक्ष त्यांची घरी जाऊन भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.  जिल्ह्याचा विकास करण्यासाठी सर्व समाजातील जनतेला सोबत घेऊन  पुढील राजकीय वाटचाल करण्यासंदर्भात त्यांनी मला शुभाशीर्वाद दिले. 

 डॉ. निलंगेकर साहेबांच्या तब्येती बाबत सध्या उलटसुलट चर्चा सुरू असून कोणीही अफवावर विश्वास ठेवू नये . त्यांची तब्येत चांगली आहे. व त्यांची तब्येत चांगली राहण्यासाठी त्यांची काळजी घेणे व देवाकडे प्रार्थना करून त्यांच्या तब्येतीत सुधारणा होणे काळाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

डॉक्टर निलंगेकर साहेबांची नेतृत्व म्हणजे आदरणीय नेतृत्व असल्यामुळे राजकारणाच्या पलीकडे जाऊन घरी जाऊन भेट घेतली आपण सर्वांनीच त्यांच्या प्रकृतीबाबत देवाकडे प्रार्थना करण्याची गरज आहे व त्यांच्या तब्येतीची काळजी घेणे सर्वांची जबाबदारी आहे .असे त्यांनी यावेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com