संभाजीनगरच्या मुद्द्यावर आदित्य ठाकरे यांचे नो कॉमेंट्‌स...

संभाजीनगरच्या मुद्द्यावर आदित्य ठाकरे यांचे नो कॉमेंट्‌स...

औरंगाबाद : सध्या मी शहराच्या विकास प्रश्नांवर बोलण्यासाठी आलोय, निवडणुका असतील तेव्हा राजकारणावर नक्कीच बोलेन असे म्हणत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरे आणि मनसेच्या औरंगाबादचे संभाजीनगर करा या मागणीवर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला. औरंगाबाद शहरातील विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्यसरकार महापालिकेच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील गेल्या महिन्यात शहरातील विकास कामांचा आढावा घेऊन सर्वोतपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे, नव्हे ते आमचे कर्तव्यच आहे. त्यामुळे आज कुठल्याही राजकीय विषयावर मी बोलणार नाही असेही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. 

शेंद्रा एमआयडीसीतील ऑरीक सिटीला भेट दिल्यानंतर लवकरच ऑरीक सिटी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होऊन येथे देश-विदेशातील मोठे उद्योग येथील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. ऑरीक सीटीमध्ये आतापर्यंत 53 उद्योगांसाठी जमिनी देण्यात आल्या आहेत, यापैकी अनेक उद्योग सुरूही झाले आहेत . भविष्यात ऑरीक सिटी देशभरात ओळखली जाईल एखाद्या शहराच्या विकासाचा वेग ठरलेला असतो . मुंबई , नवी मुंबई, पुणे या शहरांमध्ये देखील औद्योगिक विकास होण्यासाठी सुरुवातीला वेळ लागला होता. तसेच ऑरीकच्या बाबतीतही होईल, थोडे थांबा औरंगाबादचा विकास नक्की होईल असा विश्वास देखील आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com