नाशिकमधील गड-किल्ले संवर्धनासाठी चळवळ उभारावी : खासदार, छत्रपती संभाजीराजे भोसले 

कोल्हापूर, साताऱ्यात नावाजलेले गडकोट, किल्ले आहेत. मात्र नाशिक परिसरात देखील असंख्य किल्ले आहेत. ते पूर्णतः दुर्लक्षीत असून यातील एकही किल्ला केंद्रीय पुरातत्व विभागाच्या यादीत समाविष्ट नाही. त्यामुळे या किल्ल्याच्या विकासासाठी नाशिककरांनी चळवळ उभारली पाहिजे. त्यातून या किल्ल्याच्या विकासाचा मार्ग मोकळा होईल असा विश्‍वास खासदार खासदार, छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केला.
नाशिकमधील गड-किल्ले संवर्धनासाठी चळवळ उभारावी : खासदार, छत्रपती संभाजीराजे भोसले 

नाशिक  : कोल्हापूर, साताऱ्यात नावाजलेले गडकोट, किल्ले आहेत. मात्र नाशिक परिसरात देखील असंख्य किल्ले आहेत. ते पूर्णतः दुर्लक्षीत असून यातील एकही किल्ला केंद्रीय पुरातत्व विभागाच्या यादीत समाविष्ट नाही. त्यामुळे या किल्ल्याच्या विकासासाठी नाशिककरांनी चळवळ उभारली पाहिजे. त्यातून या किल्ल्याच्या विकासाचा मार्ग मोकळा होईल असा विश्‍वास खासदार खासदार, छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केला. 

ते म्हणाले, ''राज्यातील रायगड, विशाळगड, पन्हाळा, सिंधुदुर्ग यांसह दहा महत्वाच्या किल्ल्यांच्या विकासासाठी केंद्रीय पुरातत्व विभागामार्फत शंभर कोटींचा निधी दिला जाणार आहे. त्यातून या किल्ल्यांच्या डागडुजीसह विकासाची कामे होतील. मात्र त्याहीपुढे जाऊन आपल्याला कामे करावी लागतील. कोल्हापूर, साताऱ्याप्रमाणेच नाशिक परिसरातही विविध गडकोट-किल्ले आहेत. मात्र त्यातील एकही केंद्रीय पुरातत्व विभागाच्या यादीत समाविष्ट झालेला नाही. त्यामुळे तेथे अनेक अडचणी आहेत. यापुढील काळात या किल्ल्याच्या विकासासाठी नाशिककरांनी चळवळ उभारण्याची गरज आहे. त्यातून किमान या किल्ल्यांचा केंद्रीय पुरात्तव विभागाच्या यादीत समावेश होऊन त्यांचा विकास शक्‍य होईल.'' सामाजिक संस्थांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

शहरातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान रविवारी 'सकाळ एक्‍सलन्स ऍवॉर्ड'ने करण्यात आला. येथील हॉटेल ग्रॅंड रिओमध्ये खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले, नाशिक साकळचे संपादक श्रीमंत माने यावेळी उपस्थित होते. खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले आणि पर्यटन तथा अन्न व औषध प्रशासनमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.  यावेळी खासदार, छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी 'सकाळ'सारख्या माध्यम समूहाकडून सन्मान होणे, ही गौरवाची बाब आहे,समाजाप्रति बांधिलकी जोपासताना यापुढेही अवितरपणे योगदान देण्याची सन्मानार्थींची जबाबदारी वाढली आहे, असे सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com