sambhaji raje appeal who apposed maratha reservation | Sarkarnama

मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिका मागे घ्या, संभाजीराजे छत्रपतींचे आवाहन 

संपत देवगिरे 
रविवार, 16 डिसेंबर 2018

नाशिक : मराठा आरक्षणाविरोधात ज्यांनी याचिका दाखल केली आहे त्यांना माझे सांगणे आहे, की मराठा समाजाचे आरक्षण इतर कुणाच्या वाट्याचे नाही. त्यामुळे त्याला विरोध करू नका, तर आपण सर्वजण एकत्र नांदू या, मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिका मागे घ्यावी असे आवाहन असे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे. 

नाशिक : मराठा आरक्षणाविरोधात ज्यांनी याचिका दाखल केली आहे त्यांना माझे सांगणे आहे, की मराठा समाजाचे आरक्षण इतर कुणाच्या वाट्याचे नाही. त्यामुळे त्याला विरोध करू नका, तर आपण सर्वजण एकत्र नांदू या, मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिका मागे घ्यावी असे आवाहन असे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे. 

छावा क्रांतिवीर सेनेच्या अधिवेशनात संभाजीराजे बोलत होते. मराठा आरक्षणाविरोधात भूमिका घेणाऱ्यांना फटकारतानाच ते म्हणाले, की मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण मिळाले त्याचा मला आनंद आहे. मराठा समाज आरक्षण लढ्याची महाराष्ट्रानेच नव्हे देशाने दखल घेतली आहे. इतक्‍या चांगल्या पद्धतीने लढा लढला. तसेच मराठा समाजाला इतर कुणाच्या वाट्याचे नव्हे, तर स्वतंत्र आरक्षण मिळाले आहे. त्यामुळे आता ते टिकविणे महत्त्वाचे आहे. समाजाला आरक्षण मिळाले पण आता मिळालेले आरक्षण टिकविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. 

मराठा आरक्षणाच्या विषयावर मी एकटा मराठा खासदार बोललो. शाहू महाराजांनी सर्वप्रथम आरक्षणाचा विचार केला. मी छत्रपती आहे. सगळ्या जाती-धर्माच्या बहुजनांना एकत्र आणण्याच्या बाजूने आहे. सगळ्यांना एकत्र नांदण्याच्या बाजूने बोलणार. छत्रपती शिवाजी व संभाजी महाराजांवरील धडे केवळ तिसरी चौथीत नव्हे, तर नववी, दहावीतही असावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

यावेळी छावा क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, दुग्ध व पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, ऍड. शिवाजी सहाणे, नगरसेवक उद्धव निमसे, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष आमदार नरेंद्र पाटील, सुनील बागूल, विलास शिंदे, तुषार जगताप, रामकृष्ण महाराज लहवितकर, संजय पाटील, अभिजित राणे, गणेश कदम, उमेश शिंदे उपस्थित होते. 
... 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख