संभाजी पाटील निलंगेकरांचा वन मॅन शो

.
Sambhaji Patil Nilangekar
Sambhaji Patil Nilangekar

निलंगा : निलंगा विधानसभा मतदार संघातून राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनीच एकमेव उमेदवारी मागणी केल्याने या विधानसभा मतदार संघातून पालकमंत्र्याना पक्षातून कोणीही स्पर्धक नाही हे स्पष्ट झाले आहे.

 लातूर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या इच्छूक उमेदवाराच्या मुलाखती शुक्रवारी ता. सहा रोजी लातूर येथे झाल्या. यात अन्य मतदारसंघात उमेदवारीसाठी तीव्र स्पर्धा असताना स्वतःच्या मतदारसंघात मात्र पालकमंत्री वन मॅन शोˋ ठरल्याची चर्चा कार्यकर्त्यांत होत आहे. 

निलंगा, देवणी व शिरूर अनंतपाळ या तीन तालुक्याचा समावेश असलेला निलंगा मतदार संघ राजकीयदृष्या संवेदनशील आहे. या मतदार संघाला सतत राज्याच्या सत्तेमध्ये नेतृत्वाची संधी मिळाली आहे. लातूर येथे पाणीपूरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी नुकत्याच लातूर जिल्ह्यातील सहा मतदार संघातील इच्छूक उमेदवाराच्या मुलाखती घेतल्या.

 त्यामध्ये निलंगा मतदार संघ सोडून अन्य लातूर, उदगीर, औसा, अहमदपूर या मतदार संघातून अनेक उमेदवारानी मोठ्या चुरशीने मागणी केली आहे. मात्र निलंगा मतदार संघ हा एकमेव मतदार संघ असेल जिथे एकच उमेवार इच्छूक म्हणून मुलाखत झाली.

ग्रामपंचायत अथवा अन्य निवडणूकासाठी उमेदवारी मिळावी म्हणून मोठी चुरस असते ईथे मात्र एकमेव उमेदवारी समोर आल्याने पालकमंत्र्याना त्यांच्या पक्षात स्पर्धकच नसल्याचे सामोर आले आहे. पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी लातूर जिल्ह्यासह मतदार संघात मोठ्या प्रमाणात निधी आणला असून विकासाची परंपरा कायम ठेवल्याबद्दल खुद्द राज्याचे माजी मंत्री अमित देशमुख यांनी त्यांचे अभिनंदन केले होते. 

निवडणुका आल्या की विकासाच्या थापा अन् गप्पा मारणारे व मतदारांचा पुळका वाटणारे अनेकजण दिसतात मात्र मतदार संघातील नागरिकांशी कोणत्या ना कोणत्या कारणावरून ते सतत संपर्कात आहेत. देवणी व शिरूरअनंतपाळ तालुक्यात भारतीय जनता पक्षाला माननारा मोठा गट आहे.शिवाय जुने अनेक निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. 

 त्यामुळे या मतदार संघातून केवळ एकच नाव समोर आले आहे.  उमेदवारी बाबत चुरस नसल्यामुळे व एकमेव मागणी असल्याने पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या उमेदवारीवर आजच शिक्कामोर्तब झाले असून निलंगा मतदार संघातून एकमेव त्यांची उमेदवारी असल्याने या मतदार संघातून संभाजीराव पाटील निलंगेकर हे उमेदवार असल्याचे निश्चित झाले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com