निलंगेकरांची जनआशिर्वाद यात्रा पोचली 185 गावांत

..
Nilangekar-Yatra
Nilangekar-Yatra

लातूर :  निवडणूक म्हटले की, वेगवेगळ्या यात्रा आल्या. प्रचाराचे प्रभावी साधन म्हणून या यात्रांकडे राजकीय पक्ष, उमेदवार पाहत असतात. सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे निलंगा विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत.

त्यांनी काढलेली जनआशीर्वाद यात्रा मतदारसंघातील 185 गावांमधून जात   आहे. मतदारसंघात विकासाची सुरू झालेली वाटचाल आगामी पाच वर्षात पुढेही सुरू ठेवून निलंग्याचा कायापालट करण्यासाठी ही जनआशिर्वाद यात्रा असल्याचे निलंगेकर मतदारांना आर्वजून सांगत आहेत.

निलंगा मतदारसंघात निलंगा, देवणी आणि शिरुर अनंतपाळ हे तीन तालुके आहेत. या तीन तालुक्‍यात 185 गावे आहेत. पालकमंत्री निलंगेकर यांनी कोट्यावधीच्या योजना आणून या तालुक्‍यांचा विकास साधल्याचे बोलले जाते. या मतदारसंघाला राष्ट्रीय महामार्गावर आणण्यात निलंगेकरांचा मोठा वाटा आहे.या विकासकामांच्या बळावरच निलंगेकर पुन्हा या मतदारसंघातून मैदानात उतरले आहेत.

प्रचाराचा कमी कालावधी लक्षात घेता निलंगेकर यांनी जनआशीर्वाद यात्रा काढली आहे. 18 आक्‍टोबरपर्यंत ही यात्रा 185 गांवाचा टप्पा पार करणार आहे. गावोगावी यात्रेला नागरिकांचा मिळणारा पाठिंबा पाहता निलंगेकरांना मतदारांची पुन्हा पंसती मिळणार? याची उत्सूकता सगळ्यांना लागली आहे.

जनआशिर्वाद रथातून पाच वर्षात मतदारसंघाचा प्रतिनिधी तसेच जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणूनकेलेल्या विकासकामांची जंत्रीच जनतेसमोर ठेवत आहेत. तसेच पुढील पाच वर्षात मतदारसंघाचा, जिल्ह्याचा कसा कायापालट करायचा याचा आराखडा देखील मांडत आहेत. जनआशिर्वाद यात्रेच्या माध्यमातून मतदारसंघातील तळागाळाच्या घटकांपर्यंत केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजना पोहचल्या का? याची विचारपूस देखील निलंगेकर करतांना दिसतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com