मराठवाड्याच्या पाणी प्रश्‍नावर मी पंकजा मुंडे सोबतच - संभाजी पाटील निलंगेकर

मराठवाड्याच्या पाणी प्रश्‍नावर मी पंकजा मुंडे सोबतच - संभाजी पाटील निलंगेकर

लातूर : मराठवाड्याचा पाणी प्रश्‍न अतिशय गंभीर असून तो सुटण्यासाठी मी पंकजा मुंडे यांच्या सोबतच आहे. मागील काळात आम्ही सोबत काम करून त्याबाबत वेळोवेळी चर्चाही केली आहे. माजी मंत्री पंकजताई मुंडे यांनी घेतलेली भुमिका आणि त्यासाठी औरंगाबाद येथे केलेले उपोषण योग्य असून यासाठी पुढील काळात घेण्यात येणाऱ्या त्यांच्या भूमिकेसोबतच मी राहणार असल्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी स्पष्ट केले आहे.

मराठवाड्याचा पाणी प्रश्‍नावर माजी मंत्री व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी औरंगाबादेत एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले होते. यावेळी मराठवाड्यातील भाजपचे बहुतांश आमदार, पदाधिकारी उपस्थित होते. पंरतु माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या अनुपस्थितीवरून उलटसुलट चर्चां सुरू झाल्या होत्या.

या पार्श्‍वभूमीवर आज संभाजी पाटील निलंगेकर यांनी स्पष्टीकरण देत आपला पंकजा मुंडे यांच्या पाणी प्रश्‍नावरील उपोषणाला आणि भूमिकेला पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. मराठवाड्याचा पाणी प्रश्‍न सुटावा याकरिता आम्ही पक्षाच्या माध्यमातून वेळोवेळी पुढाकार घेतलेला आहे. त्याचबरोबर यासाठी आवश्‍यक पाठपुरावाही करण्यात येत आहे. पाणीप्रश्‍न अतिशय गंभीर असून तो सुटावा हीच आमची भुमिका आहे.

वास्तविक औरंगाबाद येथे झालेल्या लाक्षणिक उपोषणास मी माझ्या कौटुंबीक अडचणीमुळ उपस्थित राहू शकलो नाही याबाबतची पुर्वकल्पना प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री यांना आपण दिलेली होती. माझ्या गैरहजेरीबाबत अनेक समज-गैरसमज होत असून ते अत्यंत चुकीचे आहेत. आगामी काळातही मराठवाड्याच्या पाणी प्रश्‍नासाठी आपण कायमच लढा देत राहु आणि जोपर्यंत प्रश्‍न सुटणार नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील असेही निलंगेकर यांनी स्पष्ट केले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com