sambhaji-pail-nilangekar-introduces-new-pattern | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

दुष्काळमुक्तीचा नवा लातूर पॅटर्न निलंगेकर सोशल मिडियावर आणतात तेंव्हा ..

सुशांत सांगवे
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

लातूर जिल्ह्यात जवळपास 900 गणेश मंडळे आहेत. यातल्या प्रत्येक गणेश मंडळाने दररोज दहा-दहा शोषखड्डे तयार केले तर जवळपास एक लाख शोषखड्डे तयार होतील. त्यामुळे मोठया प्रमाणात पाणी मुरवता येईल.

लातूर  : यंदाच्या गणेशोत्सवात लातूर जिल्हा कायमचा दुष्काळमुक्त करून आपण सर्वांनी मिळून नवा लातूर पॅटर्न तयार करू, अशा शब्दांत पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी लातूरकरांना साकडे घातले आहे. तेही सोशल मीडियावरून. त्यांच्या या आवाहनाला सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा चांगलाच प्रतिसाद आहे.  गणेश मंडळे कसा प्रतिसाद देतात, याबाबत अनेकांना उत्सुकता आहे.

गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे शहरात गणेश मंडळाची पूर्वतयारी सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर निलंगेकर यांनी आपल्या फेसबुकवरून गणेश मंडळांना आवाहन करणारी क्लिप पोस्ट केली आहे. अवघ्या काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी या क्लिपला लाईक केले आहे. याआधी लातूर पोलिसांनी आयोजित केलेल्या गणेश मंडळाच्या बैठकीतही हि क्लिप स्क्रीनवरून दाखवण्यात आली होती.

यंदा 13 ते 23 सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा होत आहे. लातूर जिल्ह्यात जवळपास 900 गणेश मंडळे आहेत. यातल्या प्रत्येक गणेश मंडळाने दररोज दहा-दहा शोषखड्डे तयार केले तर जवळपास एक लाख शोषखड्डे तयार होतील. त्यामुळे मोठया प्रमाणात पाणी मुरवता येईल. यामुळे 300 ते 350 गावे दुष्काळमुक्त करता येतील. शहरातही गणेश मंडळांनी वृक्ष लागवडीवर आणि त्याच्या संगोपणावर भर द्यावा. लोकसहभागातून यंदाच्या गणेशोत्सवात आपण लातूरचा दुष्काळ कायमचा मिटवु, असे आवाहन निलंगेकर यांनी केले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख