संभाजी ब्रिगेडकडून निवडणुकीतील युतीसाठी आघाडीसह वंचितसोबतही बोलणी, पहिली यादी जाहीर

संभाजी ब्रिगेडकडून निवडणुकीतील युतीसाठी आघाडीसह वंचितसोबतही बोलणी, पहिली यादी जाहीर

औरंगाबाद : दुसऱ्यांसाठी 25 वर्षे लढलो, आता स्वतःसाठी आणि तेही जिंकण्यासाठी आम्ही आगामी विधानसभा निवडणुका लढणार आहोत, असे स्पष्ट करत संभाजी ब्रिगेडने पहिल्या 15 उमेदवारांच्या नावांची यादी शुक्रवारी (ता.23) जाहीर केली. आघाडी, युतीसह वंचित बहुजन आघाडीसोबतही आमचे बोलणे सुरु असून सोबत घेतले तर ठिक अन्यथा स्वतंत्र निवडणुका लढवू, असे प्रदेश प्रवक्‍ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी सांगीतले. 

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भानुसे म्हणाले, राज्यभर संपर्कप्रमुखांनी इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती घेतल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत आम्ही गाफील राहीलो. मात्र, आता नाही. संभाजी ब्रिगेडच्या संसदीय समितीची बैठक नुकतीच प्रदेशाध्यक्ष डॉ. मनोज आखरे, महासचिव सौरभ खेडेकर यांच्या उपस्थितीत पुणे कार्यालयात पार पडली. 

यामध्ये ब्रिगेडने विधानसभेसाठी उमेदवारांच्या पहिल्या यादीवर शिक्कामोर्तब केले. सर्वच पक्षाबरोबर संभाजी ब्रिगेडचे वरिष्ठ नेते चर्चा करत आहेत. सन्मानजनक जागा मिळाल्या तर ठिक अन्यथा, स्वबळावर लढणार किंबहुना विविध समविचारी घटकांना एकत्र घेऊन तिसरी आघाडी निर्माण करणार. संभाजी ब्रिगेडला निवडणूक आयोगाकडून शिलाई मशीन अधिकृत चिन्ह मिळाले आहे. आमचा राजकीय अजेंडा ठरलेला आहे. जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांना प्रथम प्राधान्य देऊन विधानसभा निवडणूक मैदानात उतरवणार असल्याचेही भानुसे यांनी सांगितले. 

पंधरा उमेदवारांची यादी जाहीर 
यावेळी पंधरा उमेदवारांची पहिली यादी देखील जाहीर करण्यात आली. त्यानूसार माणिकराव महादेव पावडे, कारंजा (जि.वाशिम), अशिष नरसिंगराव खंडागळे, आर्वी, (वर्धा), राजू ऊर्फ नितीन पुंडलिकराव वानखेडे देवळी, (वर्धा), दिलीप किसनराव मडावी, गडचिरोली (गडचिरोली), जगदीश नंदूजी पिलारे, ब्रह्मपुरी, (चंद्रपूर), अरुण नामदेवराव कापडे, वरोरा (चंद्रपूर), भगवान भीमराव कदम, भोकर, धनंजय उत्तमराव सूर्यवंशी, नांदेड उत्तर, (नांदेड), बालाजी माधवराव शिंदे, जिंतूर, (परभणी), टिळक गोपीनाथराव भोस श्रीगोंदा (अहमदनगर), डॉ.संदीप माणिकराव तांबारे, उस्मानाबाद (उस्मानाबाद), दिनेश गोपीनाथराव जगदाळे, म्हाडा (सोलापूर), सोमनाथ विजय राऊत, सोलापूर उत्तर (सोलापूर), किरण शंकरराव घाडगे, पंढरपूर (सोलापूर), ऋतुराज जयसिंगराव पवार, तासगाव कवठेमहाकाळ (सांगली) यांचा समावेश आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com